Film Producer Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shocking: 'दारू पाजली, प्रायव्हेट व्हिडीओ बनवले नंतर...' अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक

Film Producer Arrested: अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रपट निर्मात्याला पोलिसांनी अटक केली. दारू पाजून प्रायव्हेट व्हिडीओ काढल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. बंगळुरूमधून निर्मात्याला अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रपट निर्मात्याला अटक

  • हेमंत कुमारविरोधात गुन्हा दाखल करत बंगळुरू पोलिसांनी केली अटक

  • दारू पाजून प्रायव्हेट व्हिडिओ काढल्याचा अभिनेत्रीचा आरोप

  • आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रपट निर्माता हेमंत कुमारला पोलिसांनी अटक केली. हेमंत कुमारवर एका अभिनेत्रीने प्रायव्हेट व्हिडिओ बनवून धमकी दिल्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी हेमंत कुमारविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. बंगळुरूच्या राजाजीनगर पोलिसांनी चित्रपट निर्मात्याला अटकेनंतर कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली.

अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले की, हेमंत आणि तिची २०२२ मध्ये भेट झाली होती. हेमंतने या अभिनेत्रीला आगामी चित्रपट 'रिची'मध्ये मुख्य भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते. दोघांच्यामध्ये २ लाख रुपयांचा एक करार देखील झाला होता. ज्यामध्ये ६०,००० रुपये देण्यात आले होते. या चित्रपटाच्या शूटिंगला आणि रिलीज डेटवर वारंवार उशिर करण्यात आला. त्यामुळे ती नाराज झाली. या प्रक्रियेमध्ये हेमंतने तिला वारंवार त्रास दिला.

अभिनेत्रीने हेमंत कुमारवर असा देखील आरोप केला की, चित्रपटातील काही दृश्यांसाठी हेमंतने तिला अश्लील कपडे घालण्यास भाग पाडले होते. त्याचसोबत काही अश्लील दृश्ये शूट करण्यासाठी तिच्यावर दबाव देखील टाकण्यात आला होता. या शूटिंगवेळी हेमंतने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न देखील केला होता. हेमंतच्या या वागण्यामुळे तिला त्यावेळी प्रचंड त्रास झाला होता.

मुंबईत एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हेमंतने माझ्यासोबत घाणेरडे वर्तन केले होते. त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप देखील अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्री असं देखील म्हणाली, 'चित्रपटाच्या प्रमोशनच्या बहाण्याने हेमंत मला मुंबईत घेऊन गेला आणि दारू मिसळलेले कॉकटेल दिले. त्याने माझ्या संमतीशिवाय माझे खासगी व्हिडिओ आणि फोटो काढले. जेव्हा मी हेमंतला विरोध केला तेव्हा त्याने मला धमकावण्यासाठी गुंड पाठवण्याची धमकी दिली. त्यामुळे मी प्रचंड घाबरली होती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT