Shilpa Shetty Instagram
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty B'day: लग्नाआधी 'या' व्यक्तींसोबत जोडले होते शिल्पा शेट्टीचे नाव...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली शिल्पा शेट्टी ८ जून रोजी ४७ वर्षांची झाली आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच शिल्पा शेट्टी तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत होती.

Sanika

Shilpa Shetty's 47th Birthday: बॉलिवूड इंडस्ट्रीतील फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ८ जून रोजी ४७ वर्षांची झाली आहे. शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटातून या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाच्या यशानंतर शिल्पा शेट्टीने कधीच मागे वळून पाहिले नाही. प्रोफेशनल लाईफसोबतच शिल्पा शेट्टी तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत होती. राज कुंद्रासोबत लग्न होण्यापूर्वी शिल्पा शेट्टीचे नाव या बॉलिवूड सेलिब्रिटींशी जोडले गेले होते.

सलमान खान (Salman Khan);

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. हे दोघे एकत्र असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, या दोघांनीही कधीही सार्वजनिकरित्या याची कबुली दिली नाही.

अक्षय कुमार (Akshay Kumar);

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या लव्हस्टोरीची संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघे काही कारणाने वेगळे झाले.

अनुभव सिन्हा (Anubhav Sinha);

या यादीत बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचेही नाव आहे. 'दस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती असे सांगण्यात येते.

राज कुंद्रा (Raj Kundra);

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर शिल्पा शेट्टीने अखेर तिचा लाइफ पार्टनर म्हणून बिझनेसमन राज कुंद्राची निवड केली. शिल्पा आणि राज यांचे २००९ मध्ये लग्न झाले.

शिल्पा शेट्टी लवकरच 'निकम्मा' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT