Shilpa Shetty  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Video : तंबाखू खाणाऱ्या पापाराझीला शिल्पा शेट्टीनं फटकारले, म्हणाली...

Shilpa Shetty Scolds Paparazzi : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती पापाराझीला ओरडताना दिसत आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या फिटनेसचे चाहते दिवाने आहेत. आपल्या अभिनय आणि डान्सने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी पापाराझींशी संवाद साधताना दिसत आहे. त्यांच्यात नेमका काय संवाद झाला जाणून घेऊयात.

शिल्पा शेट्टी सध्या 'सुपर डान्सर 5'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. शिल्पा 'सुपर डान्सर 5' ची जज आहे. तिला शूटिंग लोकेशनला पापाराझींना स्पॉट केले. तेव्हा शिल्पा एका पापाराझीला ओरडताना दिसली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तंबाखू खाणाऱ्या एका पापाराझीला शिल्पा चांगलीच सुनावते. फोटो काढून झाल्यावर शिल्पा शूटिंगला जात असताना तिला पापाराझींपैकी एकाच्या तोंडात तंबाखू असल्याचे दिसते.

शिल्पा त्या पापाराझीला म्हणते की, "तु येथे ये... मला तुझे तोंड बघायचे आहे..." यावर पापाराझी हाताने आपले तोंड झाकतो आणि शिल्पाला म्हणतो की, "आता हे खाणे बंद करणार तुम्ही सांगितलं ना" त्यावर पुन्हा शिल्पा म्हणते की "तंबाखू खाणं बंद कर..." शिल्पा कायमच शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला चाहत्यांना देत असते. ती कायम फिटनेस, व्यायाम , डाएट, योगा याकडे लक्ष देताना दिसते. याचे महत्त्व ती कायम आपल्या चाहत्यांना सांगते.

शिल्पाचा लूक

व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत आहे. तिने पीच रंगाचा राजस्थानी स्टाइल ड्रेस परिधान केला आहे. मोकळे केस आणि सुंदर ज्वेलरीमध्ये तिचा लूक खुलून आला आहे.

वर्कफ्रंट

'सुपर डान्सर 5' हा शो 19 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी टीव्हीवर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता हा शो पाहता येणार आहे. शिल्पा शेट्टी लवकरच 'केडी – द डेव्हिल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 4 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

SCROLL FOR NEXT