Shilpa Shetty Raj Kundra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Raj Kundra: आधी हॉटेल बंद केलं, आता तब्बल 'इतक्या' कोटींची नोटीस...; शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी थांबेना

Shilpa Shetty Raj Kundra: मुंबई पोलिसांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केला आहे.

Shruti Vilas Kadam

Shilpa Shetty Raj Kundra: मुंबई पोलिसांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केला आहे. शिल्पा आणि राज यांच्यावर उद्योगपती दीपक कोठारी यांची सुमारे ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हे प्रकरण त्यांच्या बंद झालेल्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. उद्योगपती दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा आणि राज यांनी व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली त्यांच्याकडून ६० कोटी रुपये घेतले होते परंतु त्यांनी हे पैसे वैयक्तिक वापरासाठी वापरले. आरोपानुसार, ही रक्कम कर्ज म्हणून घेतली गेली होती, परंतु नंतर ती कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवण्यात आली.

तक्रारदाराने आरोप केला आहे की, यापूर्वी त्यांना आश्वासन देण्यात आले होते की ही रक्कम १२ टक्के वार्षिक व्याजदराने योग्य वेळी परत केली जाईल. एप्रिल २०१६ मध्ये शिल्पा शेट्टीने लेखी स्वरूपात वैयक्तिक हमी देखील दिली होती, परंतु काही महिन्यांतच तिने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.

नंतर कोठारी यांना कळले की कंपनीविरुद्ध १.२८ कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला आधीच सुरू आहे, ज्याची त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. पण, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे आरोप निराधार आणि कपलची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Delhi Tourism : दिल्लीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांचे आकर्षण, सुट्टीत येथे ट्रिप प्लान कराच

Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या जयवंत नगर गावातील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढले

iPhone 15 Offer: मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर! आयफोन १५ वर मिळत आहे २०,००० रुपयांची सूट, लगेच ऑर्डर करा

SCROLL FOR NEXT