Shruti Vilas Kadam
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात आमिर खानने ऑटिझम असलेल्या मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटात आमिर खानने एका कला शिक्षकाची भूमिका देखील साकारली होती.
सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित 'हिचकी (२०१८)' या चित्रपटात राणी मुखर्जीने एका विशिष्ट प्रकारच्या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या शिक्षिकाची भूमिका साकारली होती.
विकास बहल दिग्दर्शित 'सुपर ३०' या चित्रपटात ऋतिक रोशनने बिहारमधील गणित शिक्षक आनंद कुमारची भूमिका साकारली होती. आनंद कुमारने गरीब मुलांना मोफत शिकवले, त्यांनी शिकवलेल्या गरीब मुलांनी नंतर आयआयटीसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या.
शाहरुख खान अभिनीत 'चक दे इंडिया (२००७)' हा चित्रपट शिमित अमीन यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट महिला हॉकी संघ तयार करणाऱ्या प्रशिक्षकाची कथा होती.
'ब्लॅक (२००५)' या चित्रपटात अमिताभ बच्चनने एका अंध आणि मूक मुलीच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी होते.
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या मिलिंद उके दिग्दर्शित 'पाठशाला' या चित्रपटात शाहिद कपूरने इंग्रजी आणि संगीत शिक्षकाची भूमिका साकारली होती.
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैदान' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले होते. या चित्रपटात अजय देवगणने फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली होती.