Shefali Jariwala Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल, एक्स बॉयफ्रेंडसाठी दिला होता खास मेसेज

Shefali Jariwala Last Post Before Death: बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालने जगाचा निरोप घेतला आहे. शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुल्कासाठी ही खास पोस्ट केली होती.

Siddhi Hande

काँटा गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली जरीवालाने (Shefali Jariwala Death) जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी तिचं निधन झालं आहे. शेफालीच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं असल्याचे सांगितलं जात आहे. शेफालीच्या निधनाआधी तिने शेवटची पोस्ट केली आहे. तिने एक्स बॉयफ्रेंडसाठी खास मेसेज लिहला होता.

शेफालीची शेवटची पोस्ट (Shefali Jariwala Last Post)

शेफाली जरीवालाने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी (Siddharth Shukla) पोस्ट केली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या डेथ अॅनिव्हर्सरीनिमित्त शेफालीने पोस्ट केली होती. तिने सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत खास भावनिक पोस्ट लिहली होती.

शेफालीने पोस्टमध्ये आज तुझ्याबद्दल विचार करतेय, सिद्धार्थ शुक्ला, असं लिहलं आहे.तिने सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो बिग बॉस १३ च्या घरातील असल्याचे दिसत आहे. ते दोघेही बिग बॉस १३ मध्ये एकत्र होते.

सिद्धार्थ आणि शेफाली १५ वर्षांआधी रिलेशनशिपमध्ये एकत्र होते. त्यानंतर त्यांचं नाव तुटले. २०१४ मध्ये शेफालीने अभिनेता प्रयाग त्यागीशी लग्न केले.

मिडिया रिपोर्टनुसार, शेफालीचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाला. मुंबईला तिच्या राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रयागने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.शेफालीच्या कुटुंबाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शेफालीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांसोबतच सिनेसृष्टीतील मित्रांना धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण काय?VIDEO

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT