Shefali Jariwala  x
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala : शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? अभिनेत्रीचा मृत्यू औषधांमुळे? तारूण्याच्या नादात जीवाचा घात?

Shefali Jariwala News : तारुण्याच्या मोहापायी अँटी-एजिंग इंजेक्शनसारखी औषधं घेणाऱ्या शेफालीच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण झालेत. मात्र शेफालीचा मृत्यू खरचं औषधांमुळे झालाय का? शेफालीच्या मृत्यूमागे नेमकं गूढ काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही? त्यातही जर तुम्ही ग्लॅमर्स क्षेत्रात असाल तर तुम्हाला सौदर्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. तारुण्य टिकवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी औषध घेत असतात. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर ती अँटी-एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन्स इंजेक्शन्स आणि गॅस्ट्रिक औषधं घेत असल्याचं समोर आलं आणि अनेकांना धक्का बसला.

तारुण्य टिकवण्यासाठी घेत असलेली औषधं नेमकी मानवी शरीरासाठी किती हानिकारक आहेत.. पाहूयात...

तारूण्याच्या नादात जीवाचा घात?

1) अँटी-एजिंग व्हाईल्स

अँटी-एजिंग व्हाईल्स औषधं, इंजेक्शन्स स्वरुपात उपलब्ध

तारुण्य टिकवण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी औषधांचा वापर

औषधांच्या दीर्घकाळ वापरानं यकृताचं नुकसान

2) व्हिटॅमिन इंजेक्शन्स

थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी इंजेक्शन्सचा वापर

व्हिटॅमिन ए आणि डीचे अधिक प्रमाण शरीरासाठी हानिकारक

मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित आजार

3) गॅस्ट्रिक औषधे

औषधामुळे पोटातील आम्ल कमी होण्यास आणि अन्नपचनास अडथळा

दीर्घकाळ औषधं घेतल्यानं शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

कॅल्शियमचे शोषण कमी होत असल्यानं हाडे कमकुवत

दरम्यान अशाप्रकारच्या औषधांना FDA नं मान्यता दिला नसल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. त्यामुळे शेफालीच्या मृत्यूला अशीच औषधं कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र जर शेफाली घेत असलेली औषधंही याला कारणीभूत ठरली असतील तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तारूण्य अबाधित राखण्यासाठी तुम्ही पण अशी औषध घेत असाल तर आत्ताच सावध व्हा.नाहीतर तारूण्याच्या नादात फुका जीव गमवाल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Cheese Ball Recipe : मुलांच्या टिफिनसाठी बनवा खुसखुशीत कोथिंबीर चीज बॉल, वाचा रेसिपी

Veg Crispy Recipe: हॉटेलसारखी 'व्हेज क्रिस्पी' आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Maharashtra Government : १५ जानेवारीला राज्यात सरकारी भरपगारी सुट्टी, शाळाही राहणार बंद, कारण काय ?

Don 3: रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याचं नशीब उजळणार; फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये करणार धमाकेदार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT