Shefali Jariwala Last Video Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala : रोज थाटात कारने यायची, आज थेट मृतदेह आला; शेफाली जरीवालाचा शेवटचा VIDEO समोर!

Shefali Jariwala Last Video : मृत्यूनंतर नियमाप्रमाणे शेफाली जरीवाला हिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह शेफालीच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. तिच्या मृत्यूचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तिच्या अचानक जाण्याने बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. शेफाली जरीवालावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतर आता शेफाली जरीवालाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे.

मृत्यूनंतर नियमाप्रमाणे शेफाली जरीवाला हिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह शेफालीच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. हा मृतदेह अगोदर तिच्या राहत्या घरी आणण्यात आला असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेफाली रोज तिच्या घरी कारमधून यायची. पण सर्वांशी मिळून मिसळून वागणारी याच शेफालीचा आज मृतदेह आल्याने त्या परिसरात राहणाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेफाली जरीवालाच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. डॉक्टरांनी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समोर येणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. शेफालीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाचा भोगळ कारभार, प्रवाशांना दोन वेळा तिकीट घेण्याची वेळ

EPFO 3.0: आता एटीएममधून काढता येणार PFचे पैसे; EPFO 3.0 कसं काम करणार? वाचा सविस्तर

भाजपला सर्वात मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल निष्फळ, माजी मंत्र्याने साथ सोडत काँग्रेसचा 'हात' पकडला

Tulsi Water Benefits For Weight Loss: झटपट वजन कमी करण्यासाठी प्या तुळशीचं पाणी, आठवडाभरातच जाणवेल मोठा फरक

Hidden Fort In Pune : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

SCROLL FOR NEXT