Shatrughan Sinha Saam Digital
मनोरंजन बातम्या

Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात का झाले दाखल? आजाराची माहिती आली समोर; सोनाक्षी-झहीरही पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Shatrughan Sinha hospitalised : शत्रुघ्न सिन्हा यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, मात्र त्यांच्या मुलाने त्यांना व्हायरल ताप असल्याचं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची कार हॉस्पिटलबाहेर पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नानंतर ६ दिवसांनी अचानक हे जोडपे हॉस्पिटलबाहेर दिसलं होतं? लगेचच नेमकं असं काय घडलं की नवदाम्पत्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. शत्रुघ्न सिन्हा जखमी झाल्याचं वृत्त आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांना व्हायरल ताप आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं त्याचा मुलगा लवने म्हटलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप आणि अशक्तपणाने त्रस्त होते, त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून डॉक्टर त्यांची तपासणी करू शकतील आणि त्यांच्यावर योग्य उपचार करू शकतील, अशी माहिती लवने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले होते. पण टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, शत्रुघ्न त्यांच्या घराच्या डायनिंग हॉलमध्ये पडले होते. 25 जून रोजी हा अपघात झाल्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा सोफ्यावरून उठताच त्यांचा पाय आदळला आणि ते कार्पेटवरून घसरले. मुलगी सोनाक्षी शेजारीच उपस्थित होती, तीने त्यांच्या मदतीसाठी धावली, अन्यथा गंभीर दुखापत झाली असती.

त्यांच्यावर तातडीने घरी उपचार करण्यात आले आणि एक दिवस घरी आरामही केला. पण त्यांच्या बरगड्यातील वेदना कमी होत नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना दाखल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. जेणेकरुन इतर सर्व चाचण्या करून दुखापत झाली आहे की नाही हे कळू शकेल. दरम्यान अहवालात कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचं समोर आलं आहे. शत्रुघ्न यांना उद्या म्हणजेच सोमवारी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT