Shark Tank India Season 2 Instagram @sonytvofficial
मनोरंजन बातम्या

Shark Tank India: 'शार्क टँक इंडिया सीजन २'मध्ये मोठे बदल

स्टार्टअपला प्रोत्साहन देणाऱ्या सोनी एंटरटेनमेंटच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला.

Pooja Dange

Shark Tank India Season 2: शार्क टँक इंडिया व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणारा रिअॅलिटी शो आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देणाऱ्या सोनी एंटरटेनमेंटच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीजन कालपासून सुरू झाला आहे. शोचा प्रोमो गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर शो ऑन एअर येण्याची प्रेक्षक वाट पाहत होते.

प्रेक्षकांची शार्क टँक इंडियाची प्रतीक्षा संपली आहे. 'शार्क टँक इंडिया 2' सोनी टीव्हीवर काल रात्री 10 वाजता सुरू झाला आहे. नवीन वर्षातील या नवीन पण दुसरा सीनजमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकांसह फॉरमॅटमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया 'शार्क टँक 2' मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत.

शार्क टँक 2009 मध्ये याच नावाने प्रसारित झालेल्या अमेरिकन शोचे हिंदी व्हर्जन आहे. या शोला परदेशात चांगला प्रतिसाद मिळाला होता. शोच्या भारतातील व्हर्जनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. जवळपास एक वर्षानंतर, 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. या सीजनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सीजनमध्ये उद्योजकतेशी संबंधित या शोचे स्वरूप पहिल्या सीजनपेक्षा खूप वेगळे असेल. पहिल्या सीजनमध्ये 35 एपिसोड दाखवण्यात आले होते. या सीजनमध्ये 50 एपिसोड असणार आहेत. 'शार्क' म्हणजेच परीक्षकांनी पहिल्या सीजनमध्ये 67 व्यवसायांमध्ये 42 कोटींची गुंतवणूक केली होती. यावेळी ही संख्याही वाढणार आहे.

'शार्क टँक इंडिया'च्या मागील सीजनमध्ये 7 परीक्षक होते. तर या सीजनमध्ये 6 परीक्षक स्पर्धकांच्या बिझनेस आयडियांचे परीक्षण करतील. अमित जैन, सह-संस्थापक - कारदेखो, पियुष बन्सल, सीईओ - लेन्सकार्ट, अनुपम मित्तल - शादी डॉट कॉम, अमन गुप्ता, सह-संस्थापक - बोट, विनिता सिंग, सीईओ- शुगर कॉस्मेटिक्स आणि नमिता थापर, मालक - एमक्युर फार्मास्युटिकल्स हे शोचे परीक्षक असणार आहेत.

सर्व स्पर्धकांच्या बिझनेस आयडियाला मंजुरी देण्याबरोबरच ते त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतवणूकही करतील. अशनीर ग्रोव्हर या सीजनचे परीक्षण करणार नाहीत. त्यांच्या जागी अमित जैन परीक्षण करतील. तर मामाअर्थचे सह-संस्थापक गझल अलख देखील या सीजनमध्ये परीक्षण करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

'शार्क टँक इंडिया 2' सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल. हा शो ऑनलाइन पाहण्यासाठी, दर्शकांना OTT अॅप Sony Live वर मेंबरशिप घ्यावी लागेल. तसेच हा शो Sony Live.com (Sonyliv.Com) आणि YouTubeवरही पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT