Banjara Movie X
मनोरंजन बातम्या

“बाई आणि बाटली या दोन गोष्टींपासून दूर राहायचं”, प्रसिद्ध अभिनेत्याने लेकाला दिला सल्ला

Banjara Movie Promotion : बंजारा हा मराठी चित्रपट १६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामांसाठी शरद पोंक्षे आणि त्यांचा लेक स्नेह पोंक्षे व्यग्र आहेत.

Yash Shirke

अभिनेते शरद पोंक्षे मागील काही दिवसांपासून 'बंजारा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच स्नेह पोंक्षेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून हा स्नेहचा पहिलाच चित्रपट आहे. शरद पोंक्षे यांनी लेकाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

शरद पोंक्षे आणि त्यांचा लेक स्नेह पोंक्षे मागील काही दिवसांपासून बंजारा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशनच्या निमित्ताने राजश्री मराठी शोबझ या कार्यक्रमाला दोघांनी भेट दिली. तेव्हा गप्पा मारताना शरद यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'मी स्नेहला एक गोष्ट सांगितली होती. या क्षेत्रात २ गोष्टींपासून लांब राहायचं. एक म्हणजे बाई आणि दुसरी म्हणजे बाटली.'

'बाई आणि बाटली दोन्ही गोष्टी करिअरची वाट लावतात. एक वेळ प्रेम कर, पण ते निष्ठेने कर. दर दोन वर्षांनी प्रेम बदलत राहील असं करु नकोस, त्याला प्रेम म्हणत नाही, हे मी स्नेहला सांगितले होते', असे वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केले. याव्यतिरिक्त पोंक्षे यांनी कार्यक्रमात इतर गोष्टींवर देखील गप्पा मारल्या.

१६ जून २०२५ रोजी बंजारा हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही बापलेकाची जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. शरद यांनी चित्रपटाची निर्मिती, तर स्नेहने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोंक्षे पितापुत्रासह चित्रपटात भरत जाधव, सुनील बर्वे, संजय मोने, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज असे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT