Shanaya Kapoor will make her Bollywood debut with Karan Johars  Bedhadak movie
Shanaya Kapoor will make her Bollywood debut with Karan Johars Bedhadak movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

कपूर घराण्यातील 'स्टायलिश गर्ल' करणार आता बॅालिवूड डेब्यू, करण जोहरने...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने(Shanaya Kapoor) इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधीच खळबळ उडवली आहे. शनाया कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तिचे मिलिअनच्या घरात फॅालोअर्स आहेत. शनाया करण जोहरच्या 'बेधडक' चित्रपटातून बॅालिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. म्हणून चाहते तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र अलीकडेच शनायाच्या आगामी 'बेधडक' चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. शनायाचा ' बेधडक'(Bedhadak) चित्रपट येणारच नाही, अशा बातम्या कानावर पडत होत्या. आता करण जोहरने चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक इंटरेस्टिंग खुलासा करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

करण जोहरने नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगविषयी सांगितले आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. लूकमध्ये शनाया, गुरफतेह आणि लक्ष्य दिसत आहे. चित्रपटाचा लूक शेअर करून त्याने चित्रपट रद्द झाला नसून, चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याची माहिती दिली आहे.

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, करण जोहरच्या 'बेधडक' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. मात्र अलीकडेच हा चित्रपटा रद्द होत असल्याच्या अपडेट समोर येत होत्या. चित्रपटाविषयी अनेक अटकळ बांधली जात होती. यामुळेच तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटीझन्सने शनाया कपूरचे काय होईल? करण जोहरचे स्टार किड्सकडे लक्ष नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र करण जोहरच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे अनेक प्रश्न दूर झाले आहेत.

करणने शनायाच्या डेब्यू चित्रपटाची तयारी लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. 'बेधडक' या चित्रपटाचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होईल. चित्रपटात शनाया कपूर, गुरफतेह पिरजादा, लक्ष्य मुख्य भूमिकेत असणार आहेत. चित्रपटाचे कलाकार सध्या स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करत आहे.

याव्यतिरिक्त शनाया ही करणच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी डीसीएमधून पदार्पण करत आहे. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॅालिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटात मुख्य अभिनयाने बॉलिवूड पदार्पण केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT