नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरातील अनेक भाजप उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले अयोध्येचे भाजप उमेदवार. अयोध्या हे फिरोजपूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते, याठिकाणी भाजपचे लल्लू सिंह उमेदवार होते. या निकालावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी 'रामायण' मालिकेमध्ये लक्ष्मणचे पात्र साकारणाऱ्या सुनील लहरी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. अशातच आता ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनीही अयोध्येबद्दल एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुकेश खन्ना यांनी लिहिले की, "भव्य मंदिरासोबत आजुबाजुच्या रहिवासीयांचेही आयुष्य उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे अयोध्या निवडणूकीतील पराभवातून आपण शिकायला हवे. करोडोंच्या बजेटमधील काही हिस्सा तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी बाजूला ठेवायला हवा. मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूर जवळचं खाटू शामचं मंदिर असो... श्रद्धा स्थळ असणाऱ्या ठिकाणांना तुम्ही टुरिस्ट स्पॉट बनवू नका. तिथेही अनेक लोकं राहतात, त्यांची ही काळजी घ्या..."
मुकेश खन्ना यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी मुकेश खन्ना यांना ट्रोल केले आहे. "एकदा अयोध्येला येऊन बघा किती विकास आणि रोजगार दिला आहे आणि मग बोला.", "भाजप उमेदवार हरला म्हणून आज तू असं म्हणत आहेस. तुम्ही जिंकला असता तर असं म्हणाले असते का ?" तर एका युजरने थेट त्यांना "पलटू राम" म्हणाला आहे. अभिनेत्याची ही इन्स्टा पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.