Aryan Khan News Saam TV
मनोरंजन बातम्या

Aryan Khan News : आर्यन खानने खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता; गौरी-शाहरुखचं खास कनेक्शन, अपार्टमेंटची किंमत किती?

Aryan Khan Buys New Property : शाहरुख आणि गौरी खान राहत होते त्याच बिल्डिंगमध्ये आर्यनने 2 मजले खरेदी केले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की नक्की किती किंमत देऊन आर्यनने ही मालमत्ता खरेदी केली आहे.

Parag Kharat

किंग खान शाहरुख आणि गौरी खानचा लाडका मुलगा आर्यन खानने डेब्ब्यू करण्याआधीच करोडो रुपयाची मालमत्ता खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. होय बातमी अशी आहे की दिल्लीमध्ये जिथे शाहरुख आणि गौरी खान राहत होते त्याच बिल्डिंगमध्ये आर्यनने 2 मजले खरेदी केले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की नक्की किती किंमत देऊन आर्यनने ही मालमत्ता खरेदी केली आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात.

करोडोमध्ये आहे खरेदी केलेल्या मालमत्ताची किंमत

द इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्राद्वारे आर्यन खानने दिल्लीच्या दक्षिण भागात पंचशील पार्कमध्ये करोडो रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्यासाठी आर्यनने तब्बल 37 करोड रुपये दिले आहेत. सुरवातीच्या काळात शाहरुख आणि गौरी खान याच बिल्डिंगमध्ये राहत होते. या बिल्डिंगचे डिझायनिंग स्वतः गौरी खानने केले आहे.

शाहरुख खानचीही दिल्लीत आहे करोडोची मालमत्ता

शाहरुख खान आणि गौरी खान पहिल्यांदा दिल्लीतच भेटले होते. शाहरुखची दिल्लीत आधीपासूनच खूप जास्त मालमत्ता आहे. ज्या बिल्डिंगमध्ये आर्यन खानने 2 मजले खरेदी केले आहेत त्याच बिल्डिंगचा तळमजला आणि बेस्मेंट शाहरुख खानचं आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे 27,000 हजार क्षेत्रफळाचा हेरिटेज विलाही आहे. शाहरुखने 2001 मध्ये 13 करोडपेक्षाही जास्त किंमतीने खरेदी केला आहे.

आर्यन खानच्या डेब्ब्यू बद्दल बोलुयात

आर्यन खान लवकरच एक वेबसिरीजच्या माध्यमातून डेब्ब्यू करणार आहे. 'स्टारडम' ही एक वेबसिरीज आहे त्याचं दिग्दर्शन आर्यन खान करणार आहे. असं ऐकण्यात आलं आहे की शाहरुख खान या वेबसिरीजमध्ये छोटीसी भूमिकाही करणार आहे. अजूनतरी याबाबत पक्की बातमी आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT