Shah Rukh-Salman And Aamir
Shah Rukh-Salman And AamirSaam Tv

तिन्ही खानांना साइन करण्यासाठी चड्डी-बनियान विकावी लागेल, Anant Ambani च्या प्री-वेडिंगनंतर Shah Rukh Khan चा जुना VIDEO व्हायरल

Shah Rukh-Salman And Aamir Dance Video: सलमान खानने शाहरुख खानसोबत काम केले. पण आमिर खानने शाहरुख खानसोबत आजपर्यंत काम केले नाही. आमिर खानसोबत सलमान खानचा एकच चित्रपट आहे आणि तोसुद्धा ९० च्या दशकातला.
Published on

Shah Rukh Khan Video Viral:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानचीच (Aamir Khan) चर्चा होत असते. हे तिन्ही खान बरीच वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. बऱ्याच इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसले पण ते कधीच एकमेकांशी फोटो काढताना अथवा बोलताना दिसले नाही. त्याचसोबत ते आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये एकत्र दिसले नाही. सलमान खानने शाहरुख खानसोबत काम केले. पण आमिर खानने शाहरुख खानसोबत आजपर्यंत काम केले नाही. आमिर खानसोबत सलमान खानचा एकच चित्रपट आहे आणि तोसुद्धा ९० च्या दशकातला.

शाहरुख-सलमान आणि सलमान- आमिरने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण हे तिन्ही खानने कधीच एकत्र चित्रपटात काम केले नाही. पण या तिघांनी एकत्र यावे यासाठी चाहते वाट पाहत आहेत. अशामध्ये जामनगरमध्ये झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये तिन्ही खानने एकत्र डान्स केला. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानने 'नाटू-नाटू' या गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच दरम्यान आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो तिन्ही खानच्या एकत्र कामाबद्दल वक्तव्य करताना दिसत आहे.

नुकताच जामनगरमध्ये झालेल्या अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या सर्व सेलिब्रिटींनी डान्स आणि सिंगिंग परफॉर्मन्स करत सर्वांचे मन जिंकले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी एकत्र डान्स केला. यावेळी तिन्ही स्टार्सने त्यांच्या सिग्नेचर स्टेप्स देखील केल्या. या तिघांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आता शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, तिन्ही खानांना एकत्र एखाद्या चित्रपटासाठी साइन करणं खूपच कठीण आहे. त्यानंतर आता शाहरुख खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Shah Rukh-Salman And Aamir
Salman Khan Video: अनंत अंबानीने सलमान खानला उचलण्याचा केला प्रयत्न, पण पुढं घडलं असं की...

अशामध्ये आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एक मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, 'शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसह तिन्ही खान एखाद्या चित्रपटात एकत्र दिसणं कधी शक्य आहे का?' यावर शाहरुख खान गमतीशीरपणे उत्तर देतो की, 'तुम्हाला परवडत असेल तर कृपया ऑफर द्या. तिन्ही खानांना साइन करण्यासाठी चड्डी-बनियान विकावी लागेल.' शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटिझन्स यावर मजेशीर कमेंट्स करू लागले आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट्स करत लिहिले की, 'अंबानींनी तिन्ही खानांना एकत्र एका मंचावर आणून डान्स करून घेतला.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'फक्त अंबानीच एकाच वेळी तिन्ही खानांचा खर्च उचलू शकतात.'

Shah Rukh-Salman And Aamir
12th Fail Movie: '12 वी फेल'मध्ये मनोज शर्मांसारखे दिसण्यासाठी विक्रांत मेस्सी बसला होता उन्हात, सावळ्या रंगासाठी केला नाही मेकअप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com