New Romantic Song Chaleya Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Jawan Movie's Chaleya Song: शाहरुख खान -नयनताराचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित; एका तासात 'Chaleya'ला मिळाले १ मिलियन व्ह्यूज

Pooja Dange

Shahrukh Khan - Nayanthara's Romantic Chaleya Song Out:

शाहरुख खान ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर जोमदार पदार्पण केले आहे. ४ वर्षांनी पुनरागमन केल्यानंतर शाहरुखचा आलेला पहिला चित्रपट 'जवान'ने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात कमाल केली. आता पुन्हा एकदा शाहरुख खान कमाल करणार हे निश्चित.

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'चलेया' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याने एका तासातच युट्युबवर १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

जवानच्या निर्मात्यांनी 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांच्या 'जवान'च्या साउंडट्रॅकमधील नवीन गाणे शेअर केले. या गाण्याला हिंदीत 'चलेया' म्हणतात आणि तमिळ हय्योडा आणि तेलगूमध्ये चलोना या नावाने हे गाणे हिट होत आहे.

या गाण्याचे हिंदी व्हर्जन अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायली आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे तर कुमार यांनी गीते लिहिली आहेत. शाहरुख आणि नयनतारा या गाण्यात मॉर्डन आऊटफिटमध्ये दिसत आहेत. फराह खानने कोरिओग्राफ केलेल्या रोमँटिक गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. (Latest Entertainment News)

हे गाणे रिलीज होताच, चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एसआरकेला रोमँटिक अवतारात पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. नेटकऱ्यांनी नयनतारासोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीची प्रशंसा केली आहे. तसेच नयनतारा आणि अरिजित सिंग याचे देखील कौतुक केले आहे.

जवानच्या अल्बममधील चलेया हे शाहरुख खानचे आवडते गाणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट निर्माते एटली यांनी केले आहे आणि त्यात सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख खान, विजय सेतुपतीच्या विरोधात लढताना दिसणार आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT