DDLJ Again Released  Saam TV
मनोरंजन बातम्या

DDLJ Movie: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपट पुन्हा प्रदर्शित, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त रोमिओ-ज्युलिएटला निर्मात्यांची खास भेट

डीडीएलजे संपूर्ण भारतात पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

Pooja Dange

DDLJ Movie Released For Week: शाहरुख खान आणि काजोलचा यांचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (DDLJ) हा चित्रपट बॉलिवूडमधील एक गाजलेला चित्रपट आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने शाहरुख खान आणि काजोलला सुपरस्टार बनवले.

यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, डीडीएलजे संपूर्ण भारतात पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा या चित्रपट च आनंद घेता येणार आहे.

रोहन मल्होत्रा, उपाध्यक्ष वितरण, YRF म्हणाले, “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ), सिनेमाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून भारत आणि भारतीयांसाठी पिढ्यानपिढ्या रोमान्सचा प्रतीक झाला आहे. आम्हाला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सतत मागणी केली जात होती. जेणेकरून मित्र आणि कुटुंबासह थिएटरमध्ये पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहता येईल!

यंदा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत. 10 फेब्रुवारीपासून संपूर्ण भारतात, DDLJ फक्त एका आठवड्यासाठी प्रदर्शित होईल.

DDLJ मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, वडोदरा, गुडगाव, फरीदाबाद, लखनौ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर आणि त्रिवेंद्रमसह भारतातील 37 हून अधिक शहरांमध्ये प्रदर्शित होईल. सर्व प्रेक्षकांसाठी हे खूपच मनोरंजक आहे की या व्हॅलेंटाईन डेच्या काळात, ते शाहरुख खानला राज या भूमिकेत पठान आणि DDLJमध्ये चित्रपटगृहांमध्ये पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : ठाण्यात निकालापूर्वी विजयाची बॅनर बाजी...

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT