Shahid Kapoor has shared a romantic photo with his wife Meera Rajput Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहिद कपूरने मीरासोबत शेअर केले रोमँटिक फोटो, चाहते म्हणाले- 'कबीर सिंगची खरी प्रीती'

शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. चाहते या रोमँटिक फोटोवर कमेंट करत आहेत आणि कपलचे कौतुक करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शाहिद कपूर(Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत स्वित्झर्लंडमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. हे जोडपे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सतत फोटो आणि व्हिडिओद्वारे त्याची झलक दाखवत असतं. शाहिदने आज सकाळी मीरा राजपूतसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. शाहिद कपूरचे चाहते त्यांच्या फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहिद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram) पत्नी मीरा राजपूतसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मीरा शाहिदच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. तिने गॅागल घातला आहे. तसेच त्यांच्या मागे निसर्गरम्य वातावरण आहे.

शाहिद कपूरच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'मीरा कबीर सिंगची खरी प्रीती आहे', असे एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे. "तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात', असेही एका यूजरने म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्येही हे कपल कायम सोबत राहावे यासाठी प्रार्थना केली आहे.

शाहिदने मीरासोबतचा अजून एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटाच्या स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये मीरा बॅकलेस यलो ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यापासून दूर उभी आहे.

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर बर्‍याच दिवसांपासून स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत आणि सतत सुंदर लोकेशन्सचे फोटो शेअर करत आहेत. मीरा आणि शाहिदनेही त्यांच्या मुलांसोबत तिथल्या ट्रेनच्या सफरीचाही आनंद घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT