Shahid Kapoor Farzi Best On OTT: शाहिद कपुरची ‘फर्जी’ही वेबसीरिज सध्या ओटीटीवर कमालीची चर्चेत आहे. वेबसीरिज प्रदर्शित झाल्यापासून ओटीटीसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच बोलबाला होताना दिसतोय. शाहिदने या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीमध्ये डेब्यू केले असून प्रेक्षकांना त्याची भूमिका फारच भावली. या वेबसीरिजने ओटीटीवर लोकप्रिय वेबसीरिजचा मान मिळवला.
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झालेल्या ‘फर्जी’मध्ये, तो साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री राशी खन्नासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका व्यावसायिक कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या शाहिदची कहाणी, बनावट नोटा बनवणे, त्याची गरिबी आणि त्यात दाखवलेला लव्ह अँगल प्रेक्षकांच्या फारच पसंदीस उतरला असून त्या वेबसीरिजने एक नवा विक्रम रचला. इतकंच नाही तर अनेक लोकप्रिय वेबसीरिजला मागे सारत आपलं स्थान पक्क केलं.
‘फर्जी’चा पहिला सीझन नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याच्या दुसऱ्या सीझनची अद्याप घोषणा झाली नसून त्यात काही तरी आणखी इंटरेस्टिंग पाहायला मिळणार असल्याची चर्चा होते. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूरला अभिनयासाठी समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. यासोबतच चाहत्यांना त्याचे पात्र देखील खूप आवडले. खुद्द अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्याने सांगितले की फर्जी ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज ठरली.
शाहिद कपूरने इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यामध्ये सर्वांचे आभार मानले. इतकं प्रेम दाखवल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले. ‘फर्जी’चा दुसरा सीझन कधी येईल असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला. शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये, अनेक वेबसीरिज आहेत. हा रिपोर्ट ओरमॅक्स इंडियाने जारी केला असून ज्यामध्ये सर्वाधिक पाहिलेल्या वेब सीरीजचा डेटा जारी करण्यात आला आहे.
राशी खन्नाचा ‘रुद्र: द एड ऑफ डार्कनेस’ ही वेबसीरिज दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर ‘मिर्झापूर सीझन २’, चौथ्या क्रमांकावर ‘पंचायत सीझन 2’, पाचव्या क्रमांकावर ‘क्रिमिनल जस्टिस बिहाइंड क्लोस्ड डोअर्स’, सहाव्या क्रमांकावर ‘द नाईट मॅनेजर’, सातव्या क्रमांकावर ‘फॅमिली मॅन सीझन 2’, आठव्या क्रमांकावर ‘ताजा खबर’, नवव्या क्रमांकावर ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ आणि दहाव्या क्रमांकावर ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.