Deva Song Bhasad Macha Google
मनोरंजन बातम्या

Deva Song Bhasad Macha: मिका सिंगचा आवाज; शाहीदचा कॉप अवतार अन् पूजा हेगडेचे मूव्स, देवा चित्रपटातील 'भसड मचा' गाणं रिलीज!

Bhasad Macha : अभिनेता शाहिद कपूरचा आगामी 'देवा' चित्रपटातील 'भसड माचा' हे बहुप्रतिक्षित गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Deva Song Bhasad Macha : बॉलिवूडचा फेमस अभिनेता शाहिद कपूरचा आगामी 'देवा' चित्रपटातील 'भसड माचा' हे बहुप्रतिक्षित गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. अनेक पोस्टर्स आणि टीझरने प्रेक्षकांना खिळवून ठेवल्यानंतर, संपूर्ण गाणे आता रिलीज झाले असून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'भसड मचा' या गाण्याची सुरुवात आकर्षक लयीने होते जी लगेच तुमचे लक्ष वेधून घेते. शाहिद कपूरचा पोलिस अवतार बोल्ड आणि डायनॅमिक आहे. तसेच या गाण्यातील शाहिदची सिग्नेचर स्टेप आणि त्याचा स्वॅग लक्षवेधून घेत आहे.

'भसड मचा' शाहिद कपूर पोलिसांच्या वेशात दिसत आहे. यामध्ये त्यांने पांढरा शर्ट, खाकी पँट आणि कंबरेवर पिस्तूल घालून.डायनॅमिक दिसत आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर हे गाण शूट करण्यात आले आहे. या गाण्यात गोंधळलेल्या आणि मजेदार वातावरणात दाखवण्यात आले आहे. या गाण्यातील पूजा हेगडेच्या डान्सचे कौतूक करण्यात येत आहे.

मुंबई पोलिस आणि सॅल्यूट सारख्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मल्याळम चित्रपट निर्माते रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित, देवामध्ये पूजा हेगडे, पावेल गुलाटी, प्रवेश राणा आणि कुब्ब्रा सैत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'भसड मचा या गाण्याला विशाल मिश्रा यांचे संगीत लाभले असून जेक्स बेजॉय यांचे मूळ पार्श्वसंगीत आणि अमित रॉय यांचे छायाचित्रण आहे. आगामी देवा हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Humanoid robot gives birth: जगातील पहिला ह्यूमनॉइड रोबोट बाळाला देणार जन्म? चीनमधील शास्त्रज्ञांचा दावा

Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

SCROLL FOR NEXT