Shah Rukh Khan : बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख त्याचा आलिशान बंगला 'मन्नत' रिकामा करणार आहे. तो काही महिने वांद्रे येथे भाड्याच्या घरात त्याच्या कुटुंबासह राहणार आहे. अलिकडेच, शाहरुखने जॅकी भगनानी आणि त्याची बहीण दीपशिखा यांच्याकडून पाली हिलमध्ये दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट 'पूजा कासा' नावाच्या इमारतीत आहेत.
शाहरुख खानचे मुंबईतील 'मन्नत' हे घर २०० कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज आहे. बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारचे हे घर पर्यटकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब २५ वर्षांपासून या प्रसिद्ध बंगल्यात राहत आहेत. एका वृत्तानुसार, वांद्रे बँडस्टँडसमोरील 'मन्नत' या इमारती रिडेव्हलप केले जाणार आहे.
नूतनीकरणासाठी न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली आहे.
अहवालात म्हटले आहे की, 'मन्नत' येथील नूतनीकरणाचे काम या वर्षी मे २०२५ मध्ये सुरू होईल. यामध्ये बंगल्याच्या काही भागांचा विस्तारही केला जाईल. शाहरुख खानने बंगल्याचा विस्तार करण्यासाठी न्यायालयाकडून मंजुरीही घेतली आहे. किंग खान 'मन्नत' हा बंगला प्रत्यक्षात 'ग्रेड थ्री' हेरिटेज प्रॉपर्टीच्या श्रेणीत येतो. अशा परिस्थितीत, त्याच्या रचनेत कोणताही बदल करण्यापूर्वी, न्यायालय आणि महानगरपालिका (BMC) कडून मान्यता घेणे आवश्यक आहे.
'मन्नत' मध्येरिडेव्हलपमेंटचे काम दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू राहील.
या नूतनीकरणाच्या कामाला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे, शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि मुले आर्यन आणि अबराम यांच्यासोबत काही महिन्यांसाठी भाड्याच्या घरात शिफ्ट होणार आहे. एका अंदाजानुसार, 'मन्नत'च्या नूतनीकरणाला किमान दोन महिने लागतील.
१४ फेब्रुवारी रोजी भाडे करार झाला, दरमहा २४.१५ लाख रुपये द्यावे लागतील
माहितीनुसार, शाहरुख खानची कंपनी रेड चिलीजने पाली हिलमधील पूजा कासा इमारतीत दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही अपार्टमेंटसाठी 'रजा आणि परवाना करार' करण्यात आला. करारातील दोन्ही अपार्टमेंटचे एकूण भाडे प्रति वर्ष २.९ कोटी रुपये म्हणजेच दरमहा २४.१५ लाख रुपये आहे. हे अपार्टमेंट चित्रपट निर्माते आणि रकुल प्रीत सिंग यांचे पती जॅकी भगनानी आणि त्यांची मोठी बहीण दीपशिखा देशमुख यांचे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.