Aryan Khan Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aryan Khan Video: एकदम शाहरुख खानसारखा आवाज अन् अंदाज; आर्यन पहिल्यांदाच आला मीडियासमोर, मागितली माफी

The Bads Of Bollywood : शाहरुख खानचा लेक आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच आर्यन मीडियासमोर आला आहे.

Shreya Maskar

शाहरुख खानचा लेक आर्यन खान सध्या चांगला चर्चेत आहे.

आर्यन खानचा शो 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्यन खानच्या कार्यक्रमातील भाषणाने सर्वांची मने जिंकली आहेत.

बॉलिवूडचा किंग खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याचा मुलगा आर्यन खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच आर्यन खानचा पहिला शो 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा (The Bads of Bollywood) प्रिव्ह्यू रिलीज कार्यक्रम थाटामाटात पार पडला आहे. आर्यन खानच्या (Aryan Khan) इंडस्ट्रीतील पदार्पणासाठी खान कुटुंब उत्सुक पाहायला मिळाले. स्वतः शाहरुख खान लेकाला पाठिंबा देण्यासाठी आला होता.

कार्यक्रमातील आर्यन खानचा हटके अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांनी सर्वांचे मन जिंकले आहे. कार्यक्रमात आर्यन खानने एका खास स्टाइलमध्ये आपली ओळख प्रेक्षकांना करून दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आर्यन स्टेजवर भाषण देण्यासाठी आला. तेव्हा खूप अस्वस्थ वाटत होता. त्याने स्टेजवर येताच हात जोडून सर्वांना नमस्कार केला आणि आभार मानले.

आर्यन म्हणाला, "आज मी खूप अस्वस्थ आहे. कारण पहिल्यांदाच तुम्हा सर्वांसमोर स्टेजवर आलो आहे. त्यामुळे मी गेल्या दोन दिवसांपासून घरी स्क्रिप्टचा सराव करत आहे. मी इतका घाबरलो आहे की टेलिप्रॉम्प्टरवर देखील माझी स्क्रिप्ट ठेवली आहे. जर लाईट गेली तर प्रॉब्लेम नको म्हणून मी कागदावर भाषण लिहून आणले आहे. सोबत टॉच देखील आहे आणि तरीही माझ्याकडून चूक झाली तर बाबा आहेत ना. (और भी मुझसे मिस्टेक हो जाए तो पापा है ना) या सर्वानंतर माझ्याकडून चूक झाली तर मला कृपया माफ करा. ही माझी पहिली वेळ आहे. "

शेवटी आर्यन म्हणाला की, "'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' शो बनवण्याचा एकच उद्देश आहे की, लोकांचे भरपूर मनोरंजन करणे. हा शो चार वर्षांची मेहनत, चर्चा, हजारो टेक घेऊन तयार करण्यात आला आहे. मी आता शोची निर्माती आणि माझ्या आईला स्टेजवर बोलवू इच्छितो. तिच्यामुळे आज मी या जगात आलोय." 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' हा शो 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या 60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींची होणार चौकशी; 'या' अभिनेत्रींना पाठवली नोटीस

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावे यासाठी पुण्यात वंजारी समाज आक्रमक

iPhone 17 Sale: iPhone 17 ची क्रेझ! मध्यरात्रीपासूनच मुंबईच्या Apple स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT