बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या वर्षात 'पठान' (Pathan Movie), 'जवान' (Jawan Movie) आणि 'डंकी' (Dunki Movie) असे 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि ते सुपरहिट देखील ठरले. या चित्रपटाच्या शानदार यशानंतर शाहरुख खानने हे सिद्ध करून दाखवले की त्याला बॉलिवूडचा किंग का म्हणतात. त्याच्या या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.
2018 नंतर किंग खानच्या आयुष्यात एक अशी वेळ आली ज्यामध्ये त्याला व्यावसायिक जीवनापासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमागिरी करत नव्हते. त्यामुळे शाहरुख खानचे करिअर संपले असे देखील म्हटले जात होते. पण 2023 मध्ये त्याने जबरदस्त कमबॅक केले आणि त्याचे कठीण प्रसंग संपले. 2021 मध्ये त्याचा मोठा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात काही काळ तुरुंगात राहावे लागले. आता पहिल्यांदाच शाहरुख खानने मुलगा आर्यन खानच्या अटकेबद्दल मौन सोडले आणि प्रतिक्रिया दिली.
शाहरुख खानला नुकताच 'सीएनएन न्यूज 18 ‘इंडियन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शाहरुख खानने संवाद साधताना त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सांगितला. शाहरुख खानने या शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याप्रकरणी पहिल्यांदाच मौन सोडले आणि स्पष्टपणे आपले मत मांडले.
शाहरुख खानने सांगितले की, 'गेली चार-पाच वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी रोलर-कोस्टर राईडसारखी होती. ही वर्षे खूपच त्रासदायक होती. एकापाठोपाठ एक माझे चित्रपट फ्लॉप होत होते. याशिवाय माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या होत्या. या सर्व गोष्टींनी मला मजबूत केले आणि आयुष्याने मला खूप धडे दिले. मी शांत राहिलो आणि खूप मेहनत घेतली.'
या खास संवादादरम्यान शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक समस्यांबद्दलही मोकळेपणाने बोलला. त्याने सांगितले की, 'माझ अनेक चित्रपटही फ्लॉप झाले. ज्यानंतर विश्लेषकांनी माझ्याबद्दल लिहायला सुरुवात केली की माझी वेळ संपली आहे. शाहरुख खानने 2021 मध्ये आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करताना स्वतःला आणि कुटुंबाला कसे हाताळले याबद्दल सांगितले की, 'जीवनात कठीण प्रसंग येत असताना, आशा सोडू नये आणि सत्य कथा सांगितली पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.