Shah Rukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाहाची जगभरात क्रेझ; किंग खानला मिळाला हा मोठा किताब

Shah Rukh Khan: शाहरुख खानने वेळोवेळी सिद्ध केले आहे की तो खरोखरच बॉलिवूडचा किंग आहे. आता, त्याने जगातील सर्वात स्टायलिश सेलिब्रिटींच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे.

Shruti Vilas Kadam

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड प्रमाणात आहे. शाहरुखने अनेक वेळा सिद्ध केले आहे की तो खरोखरच बॉलिवूडचा किंग आहे. आता, या अभिनेत्याने आणखी एक किताब मिळवला आहे. शाहरुख खानचे नाव आता जगातील सर्वात स्टायलिश सेलिब्रिटींमध्ये समाविष्ट झाला आहे.

जगातील सर्वात स्टायलिश सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खानचे नाव

द न्यू यॉर्क टाईम्सने या वर्षीच्या सर्वात स्टायलिश सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत शाहरुख खानचाही समावेश आहे. शाहरुख खानसोबतच या यादीत सबरीना कारपेंटर, डोची, वॉल्टन गॉगिन्स, जेनिफर लॉरेन्स, शाई गॉर्जियस-अलेक्झांडर, कोल एस्कोला आणि नोआ वायल अशी नावे आहेत.

ही यादी फॅशनवर आधारित एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जगभरातील व्यक्तींना सन्मानित केली जाते. या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण आणि खास स्टाईलसाठी 60 वर्षीय अभिनेत्याचे विशेष कौतुक करण्यात आले. या प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रमात पहिल्यांदाच शाहरुख खानने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आगामी चित्रपट

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच "किंग" मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे, "किंग" हा शाहरुख खानचा त्याची मुलगी सुहाना खानसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. शाहरुख आणि सुहाना व्यतिरिक्त, या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. पठाण नंतर, सिद्धार्थ आनंद दुसऱ्यांदा शाहरुख खान काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT