Shruti Vilas Kadam
खांदे वाकवून किंवा मान खाली घालून चालणे टाळा. यामुळे पाठीवर भार येतो व श्वास घेण्यावर परिणाम होतो.
अती वेगाने चालल्यास दम लागतो आणि फार हळू चालल्यास शरीराला योग्य व्यायाम मिळत नाही. मध्यम गती राखणे आवश्यक आहे.
हार्ड सोलचे किंवा फिट न बसणारे शूज घालून चालल्यास गुडघे, टाच आणि कंबरेवर ताण येतो. नेहमी आरामदायक व योग्य आकाराचे शूज वापरा.
दीर्घकाळ रिकाम्या पोटी वॉक केल्यास थकवा, भोवळ येऊ शकते. चालण्यापूर्वी हलका नाश्ता किंवा फळ खा.
वॉकपूर्वी आणि वॉकनंतर पाणी न पिल्यास शरीरात डी-हायड्रेशन समस्या होऊ शकते. योग्य प्रमाणात हायड्रेशन आवश्यक आहे.
मोबाईल पाहत चालल्यामुळे पोस्चर बिघडतो तसेच अपघाताचा धोका वाढतो. चालताना मोबाईल वापर टाळा.
वॉकच्या आधी हलके स्ट्रेचिंग आणि शेवटी कूल-डाउन न केल्यास स्नायूंमध्ये ताण किंवा वेदना निर्माण होऊ शकतात.