Shah Rukh Khan Pathaan Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

Pathaan: शाहरुखच्या पठानने काश्मिरमध्ये तोडला ३२ वर्षांचा 'हा' विक्रम, चित्रपटगृहात साजरी केली दिवाळी...

शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने काश्मिर खोऱ्यातील एक विक्रम मोडत चित्रपटगृहात प्रेक्षकांनी दिवाळीच साजरी केली.

Chetan Bodke

Pathaan: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांवर लागलेले अनेक आरोप हटवले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमावला आहे. 25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'पठान'ने 'बाहुबली 2' आणि 'KGF 2'ला मागे सारत बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने काश्मिर खोऱ्यातील एक विक्रम मोडत चित्रपटगृहात प्रेक्षकांनी दिवाळीच साजरी केली.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने देशात ५५ कोटींचा गल्ला जमवत, परदेशातही अनेक विक्रम मोडीत काढले. शिवाय 'पठान'ने देशात अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक लावले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'पठान'मुळे काश्मिर खोऱ्यातील चित्रपटगृहांमध्ये 'दिवाळी' साजरी झाली. इथे हाऊसफुल्लचे फलकही लावण्यात आले, याचे श्रेय 'पठान'ला जाते. असे दृश्य तब्बल 32 वर्षांनी तेथील प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

शाहरुख खानच्या पठानची चर्चा देशात सर्वाधिक काश्मिरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील प्रेक्षकांनी चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता जल्लोषच केला आहे. शाहरुख खानचे चाहते 'पठान'ची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.

चित्रपट प्रदर्शित होताच एकच गर्दी त्याच्या चाहत्यांनी थिएटर बाहेर केली आहे. काश्मीरमध्येही शाहरुख खानचे चाहते 'पठान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले. येथील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली आहेत. असे हाऊसफुल्ल दृश्य काश्मीर खोऱ्यात 32 वर्षांनंतर झाले आहे. यापूर्वी अशी क्रेझ इतर कोणत्याही चित्रपटासाठी दिसली नाही.

सोशल मीडियावर एक ट्विटही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी हाऊसफुल्ल बोर्डच्या बाजुला उभे राहत फोटो शेअर केले. त्याचबरोबर देशभरातील अन्य चित्रपटगृहांमध्येही जल्लोषाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रेक्षक थिएटरमध्ये 'पठान' पाहताना शिट्ट्या वाजवताना आणि नाचताना दिसत आहेत. 'पठाण'मध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे.

शाहरुख खानसोबत चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटाला बॉयकॉट करण्यासोबत, चित्रपट प्रदर्शित न करण्याच्याही धमक्या दिल्या जात होत्या. पहिल्या दिवशीही चित्रपट विरोधात अनेक चित्रपटगृहांमध्ये निदर्शने झाली, चित्रपटाचे पोस्टरही फाडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT