Malaika Arora: मलायका अरोरा आणि तिचा पती अरबाज खान पुन्हा एकदा विमानतळावर एकत्र दिसले. मुलगा अरहानला सोडण्यासाठी दोघेही मुंबई विमानतळावर पोहोचले होते. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे आणि अनेकदा सुट्टीत आई मलायकाला तो भेटायला मुंबईत येतो. नुकताच अरहान पुन्हा एकदा परदेशात शिक्षणासाठी परतला आहे. अरबाज आणि मलायका मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी एकत्र आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मलायका आणि अरबाज मुलगा अरहान सोबत उभे आहे. अरहानने जाताना आई आणि वडिलांना मिठी मारली. त्यानंतर त्यांनी अनेक वेळ संवादही साधला. अरबाज आणि मलायका जरी वेगळे झाले असले तरी, जेव्हा अरहानचा प्रश्न येतो तेव्हा ते दोघेही त्यांचा भूतकाळ विसरत एकत्र येतात. सोबतच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत मलायक आणि अरबाज हे दोघेही अरहानला सोडून गळाभेट करुन पुढे निघाले.
मलायका आणि अरबाजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजर म्हणतो, मला ते दोघे खूप आवडतात, ज्या पद्धतीने ते पुढे गेले आहेत, ते खाजगी आयुष्यात एकमेकांचा आदर करतात आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्या मुलासाठी असतात. ते सोबत उभे असतात. लोक तिरस्कार करतात परंतु सत्य हे आहे की हे दोघे आश्चर्यकारक पालक आहेत.
तर आणखी एक युजर म्हणतो, मलायकाची अरबाजसोबत अर्जुनपेक्षा जास्त जुळते. आणखी एका युजरने म्हणतो, ते दोघे पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी माझी इच्छा आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, मी हा व्हिडिओ 5 वेळा पाहिला, अरबाज मलाइकाचा खूप आदर करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.