Shah Rukh Khan's Jawan Ticket 60 Rs Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Movie Ticket 60 Rs: काय सांगता!, शाहरूखचा ‘जवान’ पाहता येणार फक्त ६० रुपयांत?, कुठं आणि कसं खरेदी करायचं तिकीट?

Jawan Film Ticket Prize: किंग खानच्या चाहत्यांना ‘जवान’ चित्रपट फक्त ६० रुपयांत पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan's Jawan Ticket

सध्या सोशल मीडियावर शाहरूख खानच्या आणि नयनताराच्या ‘जवान’ची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून चित्रपटाची प्री- बुकिंग जोरदार सुरु असल्याची माहिती काही जाणकारांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर प्रदर्शित होताच ट्रेलरला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाचा बोलबाला फक्त भारतातच नाही तर, परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्री- बुकिंगला सुरूवात झाली असून आतापर्यंत चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाची तिकीटांची हजारो रूपयांच्या किंमतीत विकली जात असताना, किंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. प्रेक्षकांना चित्रपट फक्त ६० रुपयात पाहायला मिळणार आहे.

शाहरूखच्या या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला मेट्रो सिटीत तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटाचे लाखो तिकीटं विक्री झाले आहेत. शाहरूखच्या चाहत्यांनी तिकीटाची किंमत जरी जास्त असली तरी, त्यांनी चित्रपट थिएटरमध्येच पाहणं पसंत केलं आहे. चित्रपटाची तिकीटे ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत विकली जात आहेत. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली सारख्या शहरांमध्ये तिकीटांची किंमत जास्त प्रमाणात आहेत. अशातच जरीही काही ठिकाणी तिकीटांची किंमत जास्त असली तरी, भारतातल्या काही थिएटर्समध्ये प्रेक्षकांना फक्त ६० रुपयांमध्ये ‘जवान’ चित्रपट पाहता येणार आहे.

कोलकात्यातील बारासातमधील लाली थिएटरमध्ये शाहरूखच्या चाहत्यांना फक्त ६० रुपयामध्ये ‘जवान’ चित्रपट पाहता येणार आहे. आणि बाल्कनीमध्ये चित्रपट पाहायचा असेल तर प्रेक्षकांना फक्त ८० रुपयामध्ये चित्रपट पाहता येणार आहे. सोबतच पद्मा आणि बारापूर या थिएटरमध्येही दर सारखेच असणार आहे.

सोबतच, मुंबईतल्या डोंगरी भागतील प्रिमियर गोल्ड थिएटरमध्येही ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांना खूप कमी पैशात पाहता येणार आहे. स्टॉल सीट्ससाठी १०० रुपये, सर्कल सीट्सचे तिकीटे ११२ उपलब्ध आहेत. तर चैन्नईतील एजीएस थिएटरमध्ये चित्रपट कमी पैशात पाहता येणार आहे. सोबतच दिल्लीतील शक्तीनगर परिसरातील अम्बा थिएटरमध्ये तिकीटाचे दर हे ७० ते ८० रुपयांना उपलब्ध आहे.

नुकतंच सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटामध्ये ७ महत्वपूर्ण बदल सुचवत U/A प्रमाणपत्र दिले होते. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला परवानगी देण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना, चित्रपटासमोर करणी सेनेने शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत.

चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, सध्या ट्रेलरची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT