Kiran Mane On Maratha Reservation Protest: ‘सावध रहा,शत्रु कुटिल कारस्थानी आहे...’; मराठा आरक्षणावरून किरण मानेंचा सरकारवर हल्लाबोल

Kiran Mane Post: सोशल मीडियावर अभिनेता हेमंत ढोमे, अश्विनी महांगडे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनंतर आता अभिनेते किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
marathi actor kiran mane
marathi actor kiran manesaam tv

Kiran Mane Post On Jalna Maratha Reservation Protest

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून सध्या सर्वत्र वातावरण ढवळून निघालंय. या प्रकरणावर फक्त राज्यातील राजकीय मंडळींचीच नाही तर, सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींचीही या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी आपले मतं मांडली आहेत. सोशल मीडियावर अभिनेता हेमंत ढोमे, अश्विनी महांगडे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनंतर आता अभिनेते किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

marathi actor kiran mane
Jaane Jaan Trailer: करीना कपूर कोणाच्या जाळ्यात अडकणार? सस्पेंस थ्रिलर 'जाने जान'चा ट्रेलर प्रदर्शित

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “माझ्या मराठा बांधवांनो... थेट बोलतो... आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की 'एका जातीवर' झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आणि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुणाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागणार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पाहिजे. ” (Actors)

आपल्या पुढे पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “मनोज जरांगे पाटील... तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुम्ही जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय... रक्त सळसळायला लागलंय... हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन!’ ”

marathi actor kiran mane
Sukhee Movie Trailer: 'उद्या तुम्हीसुद्धा म्हणणार मी सुखी आहे', शिल्पा शेट्टीच्या 'Sukhee'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतात, “अशा पोस्टवरुन जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुणाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यंत बोलत र्‍हानार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे... न्याय मिळालाच पायजे.जय शिवराय. जय भीम.” (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com