Sukhee Movie Trailer: 'उद्या तुम्हीसुद्धा म्हणणार मी सुखी आहे', शिल्पा शेट्टीच्या 'Sukhee'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

Bollywood Actress Shilpa Shetty Post: या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षांनंतर आपल्या चाहत्याचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Sukhee Movie
Sukhee MovieSaam Tv
Published On

Shilpa Shetty Movie:

रुपेरी पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) लवकरच आपल्या आगामी सुखी चित्रपटाच्या (Shukhee Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत शिल्पाचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर ६ सप्टेंबर म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षांनंतर आपल्या चाहत्याचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sukhee Movie
Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, इंग्रजी ऐकून अवधुत गुप्तेलाही हसू आवरेना...

नुकताच शिल्पा शेट्टीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सुखी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज होण्याच्या तारखेची घोषणा केली. तिने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये 'उद्या तुम्हीसुद्धा म्हणणार की मी सुखी आहे' असे लिहिले आहे. यामध्यातून तिने उद्या सुखीचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे देखील सांगितले आहे. शिल्पा शेट्टीच्या या पोस्टला अवघ्या काही तासांमध्येच १० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Sukhee Movie
Amitabh Bachchan Tweet: 'इंडिया'च्या वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचे ट्वीट चर्चेत, लिहिले - 'भारत माता की जय'

सुखी चित्रपटाच्या घोषणेनंतर या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज झाल्यापासून शिल्पाच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सुखी चित्रपटासाठी शिल्पाचे चाहते खूपच उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची शिल्पाने घोषणा केल्यानंतर आता सगळ्यांना ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.

Sukhee Movie
Archana Nipankar Exit Rama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेमधून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओतून सांगितलं कारण

सोनल जोशी दिगदर्शित या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीसोबत अमित शाध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला हे कलाकार देखील दिसणार आहेत. सुखी एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. दरम्यान, या चित्रपटानंतर शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉप यूनिव्हर्स 'इंडियन पुलिस फोर्स' या चित्रपटामध्ये महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यासोबतच शिल्पाकडे 'केडी भी है' हा चित्रपट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com