फिल्मी दुनियेतील चित्रपटांमधली ऍक्शन, स्टंट्स कलाकारांना कधी कधी महागात पडतात. अनेकदा ही ऍक्शन कलाकार स्वतः करतात तर बऱ्याचदा बॉडी डबलच्या सहाय्याने हे स्टंट केले जातात. मात्र किंग खान शाहरुख सारखा हौशी आणि मेहनती कलाकार मात्र अनेकदा असे प्रयोग स्वता करून पाहतो. मात्र यावेळी शाहरुखला याची चांगलीच किंमत मोजावी लागलीय. आगामी 'किंग' या चित्रपटासाठी शाहरुख मुंबईत चित्रीकरण करत होता. गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये ऍक्शन सीन करताना त्याला दुखापत झाली आहे. स्नायूंवर आलेल्या ताणामुळे ही दुखापत झाल्याचं कळतंय. या दुखापतीमुळे शाहरुखला उपचारासाठी थेट अमेरिकेला जावं लागलंय. डॉक्टरांनी एक महिना विश्रांतीचा सल्ला दिलाय.
किंग' चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटासह आगामी काळात शाहरुख 'पठाण 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या शिवाय 'पुष्पा' चे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबतही तो चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. 'डॉन 3' मध्ये देखील शाहरुख दिसण्याची शक्यता आहे.
डर चित्रपटाच्या शूट दरम्यान तर शाहरुखच्या 3 बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या आणि डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. कोयला चित्रपटाच्या सेटवरही गुडघ्याला दुखापत झाली होती. शक्ती चित्रपटातील इश्क कमिना गाण्यात शाहरुखने तुफान डान्स केला होता. मात्र या गाण्यादरम्यानही शाहरुखला पाठीची दुखापत झाली होती, नंतर मग अमेरिकेत जाऊन त्याने सर्जरी देखील केली. तर दुल्हा मिल गया या चित्रपटातील ऍक्शन करताना डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. माय नेम इज खान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पुन्हा डाव्या खांद्याला आणि उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र त्याच अवस्थेत त्याने चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. रा वन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डाव्या गुडघ्याचा त्रास वाढला त्यानंतर मग त्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शूट दरम्यान पुन्हा खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर लंडनमध्ये सर्जरी केली.
आता 'किंग' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुखापती नंतर पुन्हा एकदा शाहरुख विश्रांती करून परतेल आणि शूटिंग पूर्ण करून चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होईल एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.