Shah Rukh Khan In Kashmir Dunki Instagram
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan In Kashmir Dunki: शाहरूखचे काश्मिरमध्ये दणक्यात स्वागत; ‘डंकी’च्या शूटिंगला सुरूवात...

गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग संपली असून आता तो त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Gets Grand Welcome In Kashmir: बॉलीवूडचा किंग खान या वर्षात कमालीचा चर्चेत आहे, शाहरूखचा ‘पठान’ चित्रपट बॉक्स ऑफिससह ओटीटीवर देखील चांगलाच धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग संपली असून आता तो त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे. शाहरुख त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीमसोबत काश्मिरला जातानाचे फोटो सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.

शाहरूखचा आगामी ‘जवान’ चित्रपट येत्या जुन महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर ‘डंकी’ चित्रपट या वर्षा अखेरीस प्रदर्शित होणार आहे. अनेकदा शाहरूखच्या शूटिंग स्पॉटवरून सोशल मीडियावरून फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी डंकीच्या प्रदर्शनाची तारीख शेअर करत चित्रपटाचा एक टीझर शेअर केला होता. नुकतीच शाहरूख आणि ‘डंकी’ चित्रपटाची प्रोडक्शन टीम आज काश्मिरला रवाना झाली आहे. शाहरूख अनेक वर्षांनंतर ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने काश्मिरला जात आहे. यापूर्वी किंग खान ‘जब तक है जान’च्या शूटिंगच्या निमित्ताने काश्मिरला गेला होता.

शाहरूखचा सध्या ब्लॅक सुटाबुटात, गळ्यात पांढरी शाल घातलेली दिसते, जी त्याला हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी भेट म्हणून दिली होती. त्याच्या टीमचा एक सदस्य त्याच्यासोबत फुलांचा मोठा गुच्छ घेऊन जाताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो डझनभर लोकांनी घेरलेल्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.

शाहरुख सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किंग खान काश्मिरमध्ये ‘डंकी’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला आहे. सध्या त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात, त्याच्या एका चाहत्याने ‘आम्ही नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या चित्रपटांवर जीवापाड प्रेम करतो.’ असे लिहिले, तर आणखी एक म्हणतो, ‘आपका तो जलवा ही अलग है’ (Bollywood Film)

राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी यांनी केले आहे. हा एक कॉमिक चित्रपट असून देशभक्ती आणि कॉमेडी यांचे मिश्रण असलेला हा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

Bapu Aandhle Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, बीडमध्ये पुन्हा वातावरण तापले

Good News: सोलापूर- अहिल्यानगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटली; उजणी धरण १०० टक्के भरलं

समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT