shah rukh khan News Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

शाहरूख खानला कोर्टाचा मोठा दिलासा; २०१७ मधलं नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता शाहरूख खानवर अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shah Rukh Khan)आता न्यायालयीन प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. २०१७ मध्ये रईस या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरूखने गुजरातमधील वडोदरा हे संपूर्ण रेल्वेस्थानक बुक केले होते. यावेळी वडोदरा रेल्वे स्थानकावर शाहरूखच्या स्वागतासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांचा आवडत्या स्टारच्या झलक पाहण्यासाठी संपूर्ण परिसरात गोंधळ झाला होता. याप्रकरणी अभिनेता शाहरूख खानवर अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अलीकडेच, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाचा हा निर्णय नाकारत शाहरुखविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द केला होता. माहितीनुसार, यावर्षी जानेवारी 2022 मध्ये गुजरात हायकोर्टाने अभिनेत्यावर वडोदरा रेल्वे स्टेशनवर गोंधळ आणि शांतता भंग केल्याचा आरोप केला होता.

अभिनेता शाहरुख खानने त्याच्या रईस या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला येणारी संपूर्ण ट्रेन बुक केली होती. पण, दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच अभिनेत्याच्या चाहत्यांच्या जमावाने वडोदरा स्टेशनवर गोंधळ घातला. तसेच, गर्दी पाहून शाहरुखने चाहत्यांमध्ये स्मायली बॉल्स फेकले आणि त्याचा टी-शर्ट काढून फेकला. ते मिळविण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला आणि उपस्थित असलेल्या गर्दीत काही लोक जखमी झाले आणि मृत्यूमुखी देखील पडले होते.

त्यामुळे लोकांमध्ये किंगखान विरूद्ध प्रचंड रोष निर्माण झाला. जितेंद्र मधुभाई सोलंकी नामक व्यक्तीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू आणि लोकांच्या वैयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सोलंकी यांनी अभिनेत्याविरुद्ध कलम १४५ आणि १४७ रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

वर्कफ्रंट विषयी बोलायचे तर, बॉलिवूड अभिनेता शाहरुख सध्या पठाण, जवान, डंकी आणि टायगर 3 मधून तो इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. सध्या या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चाहतेही त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT