Sur Nava Dhyas Nava: 'सूर नवा ध्यास नवा'मध्ये उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक

संगीतमय रिअॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा'चा पाचवा पर्व अनोखा ठरला आहे.

Sur Nava Dhyas Nava News
Sur Nava Dhyas Nava News Saam Tv
Published On

मुंबई: महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय 'सूर नवा ध्यास नवा'- आशा उद्याची... या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच झाला. यंदा या शोचे पाचवं पर्व होतं. यंदाच्या ५ व्या आणि लक्षवेधी शोमध्ये अंतिम विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता होती. सूर नवा ध्यास नवा या रंगतदार सोहळ्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या सूरांनी साऱ्यांची मनं जिकली आहेत. यंदाच्या वर्षी कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे याने राजगायक होण्याचा मान पटकावला.


Sur Nava Dhyas Nava News
Sukesh Chandrashekhar Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा

'सूर नवा ध्यास नवा' या सोहळ्यात महाराष्ट्रातील नाही तर जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. यंदा पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून नशीब आजमावलं. त्यापैकी १६ स्पर्धकांबरोबर सुरू झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. याच स्पर्धकांतून अंतिम सहा शिलेदार मंचाला मिळाले. यात आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या स्पर्धकांचा सहभाग होता. या महाअंतिम रंगतदार सोहळ्यामध्ये उत्कर्ष वानखेडे याने स्पर्धा जिंकून राजगायक होण्याचा किताब पटकावला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी - आनंदजी या जोडीतील आनंद याच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले. विजेत्यांना सुवर्ण कट्यार देण्यात आली. दरम्यान गेल्यावर्षी अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ही विजेती ठरली होती.


Sur Nava Dhyas Nava News
Shahrukh Khan: शाहरुख खानने शर्टलेस होऊन दाखवले सिक्स अॅब्स; फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

विजेत्या स्पर्धक उत्कर्ष वानखेडेला रिअॅलिटी शोतर्फे दोन लाख रूपये, चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स यांच्याकडून सुवर्ण कट्यार तसेच केसरी टुर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनीकडून इलेक्ट्रिक स्कुटर देण्यात आली आहे. उपविजेती स्पर्धक संज्यातो जगदाळेला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरळ टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश देण्यात आला. तसेच आरोही प्रभुदेसाईला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकतर्फे हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश देण्यात आला. संगीतमय रिअॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा'चा पाचवा पर्व अनोखा ठरला आहे.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com