Dunki Teaser Release Date You Tube
मनोरंजन बातम्या

Dunki Teaser Release Date: ‘किंग खान’ वाढदिवशी चाहत्यांना देणार सरप्राईज, बहुप्रतीक्षित ‘डंकी’चा टीझर होणार रिलीज

Dunki Teaser Update: बॉलिवूडच्या किंग खानचा येत्या २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक सरप्राईज मिळणार आहे.

Chetan Bodke

Dunki Teaser Release Date

बॉलिवूडच्या किंग खानचा येत्या २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. २०२३ हे वर्ष फक्त शाहरुखसाठीच नाही तर त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरलंय. या वर्षात त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट ठरले आहेत. आता यानंतर त्याचा तिसरा चित्रपट सुद्धा प्रदर्शनाच्या तयारीत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार असून शाहरुखच्या वाढदिवशी चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१८ मध्ये शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर शाहरुखचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शाहरुखने ‘पठान’ चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दमदार पुन:रागमन केले. शाहरुखचा ‘डंकी’ बिगबजेट चित्रपट असून या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होतेय. त्याच्या वाढदिवशी अर्थात २ नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या या बिगबजेट चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #DunkiTeaser अशी जोरदार चर्चा होतेय.

गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमावर ‘डंकी’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नू सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही शाहरुख आपल्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट म्हणून ‘डंकी’चा टीझर रिलीज करणार असल्याचे बोलले जात आहे. सॅकल्निकने नुकतंच एक ट्वीट केलं आहे, मेगास्टार शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड ‘डंकी’चा टीझर त्याच्या वाढदिवशी अर्थात २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशी माहिती सॅकल्निक एन्टरटेन्मेंटने ट्वीट करत दिली आहे.

किंग खानच्या एका फॅन पेजने एक ट्वीट केले आहे, त्या ट्वीटमध्ये त्यांनी टीझरबद्दलची माहिती दिली आहे. ‘हा बहुप्रतिक्षित टीझर ५० सेकंद ते १.५० सेकंदपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर या अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी तयार राहा.’ सेन्सॉर बोर्डाने ‘डंकी’च्या टीझरला यू सर्टिफिकेट दिला आहे. ‘डंकी’ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने राजकुमार हिरानी फिल्म्स आणि जिओ स्टुडिओच्या सहकार्याने केली आहे. (Bollywood Film)

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटामध्ये विकी कौशल कॅमिओ करणार असल्याची सध्या चर्चा होतेय. ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT