Shah Rukh Khan Dunki Remake of Malayalam Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Dunki Remake of Malayalam Movie: शाहरुख खानचा ‘डंकी’ साऊथचा रिमेक?, नेटकऱ्यांनी दिग्दर्शकासह किंग खानला धरलं धारेवर

Dunki Remake News: राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Dunki Remake of Malayalam Movie

सध्या शाहरुखच्या अभिनयाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे. सप्टेंबरमध्ये ‘जवान’ प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा किंग खानच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये शाहरुखचा बहुप्रतिक्षित ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. सध्या सर्वत्र चित्रपटाची जोरदार चर्चा होत असताना, सोशल मीडियावर हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक असल्याची चर्चा होत आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाने केलेल्या एका ट्विटमुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “राजकुमार हिरानी ज्या डंकीचे दिग्दर्शन करत आहे, तो प्रसिद्ध अभिनेता सलमान दकलीरच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे नाव ‘कॉम्रेड इन अमेरिका’ असे आहे.” सध्या बॉक्स ऑफिस इंडियाने केलेल्या या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी रिट्वीट केलं आहे. एक युजर म्हणतो, “मला आता समजलं की, ‘डंकी’ हा मल्याळम चित्रपट ‘कॉम्रेड इन अमेरिका’चा स्वस्त रिमेक आहे. किमान चित्रपटाचे राईट्स खरेदी करुन तरी त्याचा रिमेक बनवा. शाहरुख अशा विचित्र युक्त्या खेळू नकोस.” अद्याप हा चित्रपट ‘कॉम्रेड इन अमेरिका’चा रिमेक आहे की नाही, माहित नसतानाच नेटकऱ्यांनी शाहरुखसह राजकुमार हिरानींना देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ही बातमी पाहून चाहते शाहरुखवर नाराज झाले आहेत.

येत्या २२ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दोन बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ सुद्धा एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप प्रभासच्या ‘सालार’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. सध्या तरी सोशल मीडियावर हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. जर हे दोन्ही ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर, कोण सर्वाधिक कमाई करेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

GST Council Meeting: अटकेची तरतूद रद्द! रिफंड, क्रेडिट लिमिटसह GST मध्ये १० मोठे बदल

मुंबई-पुणे फक्त ४८ मिनिटांत, दिल्ली-वाराणसी अवघ्या ४ तासांत...; १६ लाख कोटी...भारतीय रेल्वेनं बघितलेलं 'बुलेट' स्वप्न सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT