shah rukh khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Threat Call: शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला रायपूरमधून अटक

Shah Rukh Khan Death Threat Call Case: सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना मागील आठवड्यात शाहरूख खानला देखील धमकीचा फोन आला होता.

Manasvi Choudhary

बॉलिवूड इंडस्ट्रीतून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना मागील आठवड्यात शाहरूख खानला देखील धमकीचा फोन आला होता. ५० लाखांची मागणी करत शाहरूख खानला ५ नोव्हेंबरला जीवे मारण्याची धमकी मिळाली. पोलिसांना संबंधित व्यक्तीचा धमकीचा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता शाहरूख खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात यश आले.

छत्तीसगड रायपूरमधून शाहरूख खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. फैजान खान असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी रायपूरमधून या व्यक्तीस अटक केली असून फैजानच्या फोनचा वापर धमकी देण्यासाठी करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने कोट्यवधी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. तसेच हे पैसे न दिल्यास शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी हे स्पष्ट झाले आहे.

शाहरूख खानला धमकी आल्यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो कॉल रायपूरवरून आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांचं पथक रायपूरला रवाना करण्यात आले. यानुसार रायपूर येथून शाहरूख खानला धमकी देणारा अटक केला आहे. सध्या या व्यक्तीची शाहरूख खानला धमकी पाठवल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT