Khushi Kapoor
Khushi KapoorSaam Tv

Khushi Kapoor: खुशीने हातात घातलं बॉयफ्रेंडच्या नावाचं ब्रेसलेट; कोणाच्या प्रेमात पडली?

Khushi Kapoor: खुशी कपूरने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने घातलेल्या ब्रेसलेटवर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेलं दिसत आहे.
Published on

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुलींविषयी कायमच चर्चा सुरू असते. अभिनेत्री जान्हवी कपूर हि तिची लहान बहिण खुशी कपूर पर्सनल लाईफमुळे लाईमलाईटमध्ये आहेत. खुशी कपूरविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. अशातच सोशल मीडियावर खुशी कपूरचे फोटो व्हायरल झाले आहेत. खुशी कपूरचं नाव सध्या अभिनेता वेदांग रैनाबरोबर जोडलं जातय. या दोघांचे फोटो नुकतंच समोर आला आहे. ज्यामुळे एकच चर्चा सुरू आहे.

Khushi Kapoor
Boney Kapoor Birthday : पहिल्याच भेटीत प्रेम, बोनी कपूर आणि श्रीदेवीची फिल्मी लव्हस्टोरी

सोशल मीडियावर खुशी कपूर आणि वेदांगच्या नात्याच्या चर्चा सुरू आहेत. वेदांग आणि खुशी मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अशातच खुशीने वेदांगचं नाव लिहिलेलं ब्रेसलेट हातात घातलं आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आले आहे. मात्र दोघांनीही अद्याप अधिकृतपणे त्यांच्या नात्याबाबत खुलासा केलेला नाही.

खुशीने सोशल मिडिया शेअर केलेल्या फोटोमध्ये तीने रेड कलरचा आऊटफिट कॅरी केला आहे. खुशीचे हे लेटेस्ट फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत. खुशी कपूर कधी तिच्या नात्याबद्दल खुलासे करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com