Shah Rukh Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

Shah Rukh Khan Video: शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख हल्लीचं विमानतळावर दिसला होता. जिथे चेकिंगसाठी त्याला चष्मा काढायला लावला आणि नंतर त्याचा आयडी पाहण्यात आला.

Shruti Vilas Kadam

Shahrukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी 'किंग' चित्रपटासाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच किंग खानने या चित्रपटा संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे त्याची चर्चा आणखी वाढली आहे. 'किंग' बद्दलच्या या चर्चेदरम्यान, शाहरुख खानचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो हल्ली विमानतळावर दिसला. हा व्हिडिओ मुंबई विमानतळाचा आहे.

या व्हिडिओमध्ये, शाहरुख खान त्याच्या कारमधून उतरून विमानतळावर जाताना दिसत आहे. तो चेकिंगसाठी एयरपोर्ट गेटवर त्याचे ओळखपत्र दाखवतो. सीआयएसएफ कर्मचारी त्याला त्याचा चष्मा काढण्यास सांगतात. शाहरुख त्याचा चष्मा काढतो आणि त्याचा चेहरा त्याच्या ओळखपत्रावरील फोटोशी जुळवला जातो. त्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो.

शाहरुख खानची प्रतिक्रिया

शाहरुख खानने संपूर्ण प्रक्रिया शांतपणे केली. छान हसून प्रतिसाद दिला. आत जाताना त्याने सिक्योरिटीच्या पाठीवर थाप मारली. सोशल मीडियावर त्याचे चाहते शाहरुखचे या सहज स्वभावाचे कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्ड रवी सिंग देखील दिसत आहेत.

'किंग' रिलीज डेट

कामाबद्दल बोलायचं शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटातून शाहरुखची मुलगी सुहाना खान रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात बाप-लेकीची जोडी एकत्र दिसणार आहे. अभय वर्मा, राघव जुयाल, अर्शद वारसी, अनिल कपूर, जयदीप अहलावत, दीपिका पदुकोण आणि राणी मुखर्जी हे देखील चित्रपटाचा भाग आहेत. अभिषेक बच्चन देखील चित्रपटात आहेत. हा चित्रपट या वर्षी २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

Extramarital affairs women: ना नवऱ्याचं टेन्शन...ना समाजाची भीती; 35-40 वयोगटातील महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

SCROLL FOR NEXT