Rani Mukerji Controversy
Rani Mukerji ControversySaam Tv

Rani Mukerji: आईने वडिलांवर ओरडलं पाहिजे...; राणी मुखर्जीच्या विधानावर नेटकरी संतप्त, म्हणाले...

Rani Mukerji Controversy: राणी मुखर्जी सध्या तिच्या नवीन चित्रपट 'मर्दानी ३' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान केलेले एक विधान सोशल मीडियावर चर्चेत आहे. या विधानामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहेत.
Published on

Rani Mukerji Controversy: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी 'मर्दानी ३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने केलेल्या विधानामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. राणीने पती-पत्नीमधील नात्याबद्दल भाष्य केले. तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि बरेच लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

राणी मुखर्जी एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, "माझा असा विश्वास आहे की आदर घरापासून सुरू होतो, अगदी सहजपणे. जेव्हा एखादा मुलगा त्याच्या आईसोबत झालेली वाईट वागणूक पाहतो तेव्हा तो विचार करू लागतो की जर त्याच्या आईसोबत असे घडत असेल तर प्रत्येक मुलीशी असेच वागता येईल."

Rani Mukerji Controversy
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत त्या व्यक्तीची दमदार एण्ट्री; सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय उलगडणार

वाद कशामुळे सुरु झाला?

राणी म्हणाली, "मला वाटते की वडील त्यांच्या पत्नींशी कसे वागतात यामुळे मुलंपण तसेच होत जातात. जर त्यांच्या आईंना चांगले आणि आदराने वागवले गेले तर मुलांना समजते की मुलींचा आदर केला पाहिजे आणि समाजात त्यांचे स्थान असले पाहिजे." ती पुढे म्हणाली, "म्हणून हे सर्व घरापासून सुरू होते. वडील आपल्या बायकोवर ओरडू नये. पण, आईने वडिलांवर ओरडले पाहिजे." अनेकांना हे विधान आवडले नाही.

Rani Mukerji Controversy
Rohit Shetty: रोहित शेट्टीने घेतली नवी लक्झरी कार; व्हिडिओ व्हायरल, किंमत ऐकून नेटकरी थक्क

सोशल मीडियावर नेटकरी काय म्हणाले?

राणीची ही क्लिप व्हायरल होत आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, "मला वाटते की ती मस्करीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे" दुसऱ्याने लिहिले, "कोणीही कोणाला का ओरडावे? आपण शांततेने बोलू शकत नाही का?" अनेक लोकांचा असा विश्वास आहे की नातेसंबंध आदरयुक्त असले पाहिजेत. दोन्ही बाजूंनी ओरड न करता गोष्टी सोडवल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com