Vijay kadam death : Saam tv
मनोरंजन बातम्या

Vijay Kadam Death : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

Vijay kadam death News : चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं. त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज शनिवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिग्गज अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विजय कदम मागील दीड वर्षांपासून कर्करोगाची झुंज देते होते. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. आज शनिवारी सकाळी विजय कदम यांनी जगाचा निरोप घेतला. विजय यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विजय यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी सिनेमातील काही भूमिका प्रचंड गाजल्या

विजय कदम यांनी मराठी सिनेमांत काम केलं आहे. त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं, देखणी बायको नाम्याची, पोलीस लाईन, चष्मेबहाद्दर, सासू नंबरी जावई दस नंबरी, धुरंधर भातवडेकर या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी भिकाजीराव करोडपती, ती परत आलीये आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी सारख्या मालिकेतही त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.

विजय कदम यांनी १९८० साली छोट्या भूमिकेतून सिनेमात पदार्पण केलं. कर्करोगातं निदान झाल्यानंतर ते कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT