Sara Ali Khan Rikshaw Ride Instagram
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Rikshaw Ride: साराने केला थेट रिक्षाने प्रवास, मात्र भाडं न दिल्याने झाली ट्रोल...

Sara Ali Khan Viral Video: सारा अली खानने रिक्षामधून प्रवास केला असून साराचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Sara Ali Khan In Rikshaw Drive: अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सारा अली खान आणि विकी कौशल ही जोडी राजस्थानला प्रमोशन निमित्त गेले होते. त्यावेळी त्यांच्या प्रमोशनची कमालीची चर्चा झाली होती. आता नेमका साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत सारा मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाची सफर करताना दिसून येत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. सध्या सारा आणि विकी मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. प्रमोशननंतर घरी परतण्याच्या वेळी साराची गाडी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलीच नव्हती. म्हणून साराने वेळ न दवडता, थेट ऑटो रिक्षानेच घर गाठलं. सध्या साराची ही व्हिडीओ व्हायरल होत असून चाहत्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, सारा रिक्षाने प्रवास करताना दिसतेय. यावेळी सारा म्हणते, ‘माझी गाडी आली नाही म्हणून मी रिक्षाने प्रवास केला.’ त्यानंतर पुढे सारा म्हणते, ‘मी अनेकदा यापुर्वी देखील रिक्षाने प्रवास केलाय.’ सारा अली खानचा हा व्हिडीओ पाहून यूजर्सना ऑटो ड्रायव्हरच्या पैसे न दिल्याची चिंता लागली आहे. एक यूजर कमेंट करत म्हणतो, “रिक्षा ड्रायव्हरचे पैसे कोण देईल?... आधी ते पैसे दे” तर आणखी एक युजर म्हणतो, “ड्रायव्हरला ना पैसे दिलेस ना की चाहत्याला फोटो काढून दिला.” साराचीही ऑटो राईड पाहून अनेक युजर्सने तिला पब्लिसिटी स्टंट करतेस म्हणत तिला ट्रोल केले.

सारा अली खानने गुलाबी रंगाचा सूट परिधान करून एका ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिच्यासोबत कार्यक्रमाला विकी कौशल देखील हजर होता. यावेळी दोघांनीही चित्रपटातील गाण्यांवर जबरदस्त ठेका देखील ठरला. विकीसोबतच्या डान्सचा व्हिडिओही साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात विकी आणि सारासोबत राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या २ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, साराचा लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांना प्रेक्षकांनी म्हणावी तितकी खास पसंती दिली नाही. आता ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT