Sara Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan : साराच्या वर्कआउट व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Sara Ali Khan Workout Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या फिटनेसमुळे ओळखली जाते. सध्या तिच्या एका वर्कआउट व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan ) नेहमी तिच्या अभिनय, फिटनेस आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. साराने इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. तिने नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी साराने आपले वजन कमी केले होते. तिने यासाठी जिम आणि डाएटची मदत घेतली होती. तेव्हापासून सारा नेहमी आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसते.

सारा आपल्या सोशल मिडियावर नेहमीच फिटनेस संबंधित पोस्ट टाकत असते. सध्या अभिनेत्रीने आपला वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ती नेहमी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटने लोकांना प्रोत्साहित करत असते. अभिनेत्री नेहमीच तिच्या वर्कआउट आणि डाएट बद्दल सांगत असते. असाच एक साराचा वर्कआउट व्हिडिओ (Workout Video) सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्री साराने टाकलेला वर्कआउट व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सारा व्यायाम करताना दिसत आहे. तिचा फिटनेस फोकस यातून दिसून येत आहे. तिने या वर्कआउट व्हिडीओतून सर्वांना फिटनेसचे महत्त्व सांगितले आहे. फिटनेसमुळे आपण किती तंदुरुस्त राहू शकतो हे साराने व्हिडीओमधून दाखवून दिले आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांनी व्हिडीओवर खूप लाईक, कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सारा ऑरेंज रंगाची स्पोर्ट्स शॅार्ट आणि हिरव्या रंगाचा स्पोर्ट्स टॉपमध्ये दिसली आहे. यामध्ये सारा आपल्याला स्क्वाट्स मारताना दिसत आहे. तसेच स्ट्रेचिंग देखील करत आहे. तिच्या फिटनेस प्रेमाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सारा अली खान नुकतीच कार्तिक आर्यन सोबत 'कॉल मी बे'च्या स्क्रीनिंगला पाहायला मिळाली. तेथे त्या दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली. हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता हे दोघे पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT