Sanjay Leela Bhansal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sanjay Leela Bhansali मालामाल, 'लव्ह अँड वॉर'ने रिलीज आधीच २०० कोटी कमावले, पण कसे?

Love And War Movie : संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज आधीच या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे.

Shreya Maskar

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) त्यांचा 'लव्ह अँड वॅार' (Love And War ) नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) , अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि विकी कौशल (Vicky Kaushal )पाहायला मिळणार आहे. हे त्रिकूट पहिल्यांदाच या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करतात.

'लव्ह अँड वॅार' या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्वत: या चित्रपटाची नॉन-थिएट्रिकल डील केली आहे. त्यांनी ही डील नेटफ्लिक्ससोबत करून बेस प्राइज १३० कोटी आहे. संजय लीला भन्साळी यांनी सारेगामाकडून संगीतासाठी ३५ कोटी रुपये मिळाले आहेत. 'लव्ह अँड वॉर'ची नॉन-थिएटर कमाई सुमारे 215 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, एका मोठ्या नेटवर्कसह चित्रपटाच्या सॅटेलाइट डीलसाठी देखील चर्चा सुरू आहे ज्यामुळे त्यांना जवळपास ५० कोटी रुपये मिळू शकतील.

'लव्ह अँड वॅार' चित्रपटात एक मॅार्डन लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचे सुमारे 200 कोटी बजेट आहे. या चित्रपटात लव्ह ट्रायंगल पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०२६ ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई करेल. या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT