Sharmin Segal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sharmin Segal : संजय लीला भन्साळी यांची भाची झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म

Heeramandi Actress Pregnancy : संजय लीला भन्साळी यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. 'हीरामंडी' फेम अभिनेत्री शर्मिन सहगल आई झाली आहे.

Shreya Maskar

'हीरामंडी' या वेब सीरिजने चाहत्यांच्या मनावर घर केले आहेत. या वेब सीरिजमध्ये संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या तगड्या स्टारकास्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता या वेब सीरिजमधील एका अभिनेत्री चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्मिन सहगल (Sharmin Segal) आई झाली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

शर्मिन सहगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. शर्मिन सहगलच्या घरी लग्नाच्या दोन वर्षांनी पाळणा हलला आहे. शर्मिन सहगल आणि अमन मेहता हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत. शर्मिनने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शर्मिन सहगल आणि अमन मेहता यांनी 2023मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह सोहळा इटलीमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. सध्या शर्मिन सहगलवर नेटकरी आणि कलाकरांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शर्मिन सहगल करिअर

शर्मिन सहगलने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे 'हीरामंडी' वेब सीरिजमधील काम चाहत्यांना खूप आवडले. शर्मिन सहगलने 2019मध्ये रिलीज झालेल्या 'मलाल' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. या चित्रपटात शर्मिन सहगल बॉलिवूड अभिनेता मीजान जाफरीसोबत झळकली होती. त्यानंतर शर्मिन सहगलने 'अतिथि भूतो भव' या हॉरर-कॉमेडी चित्रपटातही काम केले आहे. शर्मिन सहगलला खरी प्रसिद्धी 'हिरामंडी' या वेब सीरिजमधून मिळाली. 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये शर्मिन सहगल हिने आलमजेबची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT