अभिनेता संजय दत्तने नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.
संजय दत्तला बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणून ओळखले जाते.
संजय दत्तचा अलिकडे 'बागी 4' चित्रपट रिलीज झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. संजय दत्तने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला बॉलिवूडमधील खलनायक आणि बॉलिवूडचा मुन्नाभाई असे म्हणतात. अलिकडेच त्याचा 'बागी 4' चित्रपट रिलीज झाला आहे. अशात आता संजय दत्तने आपले नवीन कोरे रेस्टॉरंट लाँच केले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच नवीन रेस्टॉरंटचा लाँच सोहळा पार पडला आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने सोशल मीडियावर पोस्ट करून रेस्टॉरंटची झलक दाखवली होती. या व्हिडीओला संजय दत्तने खूपच खास कॅप्शन दिले. त्याने लिहिलं की, "मी जगभर जेवलो आहे...आता लोकांना जेवू घालायची माझी वेळ आहे... अनेकांपैकी पहिले!" सध्या संजय दत्तवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संजय दत्तच्या नवीन रेस्टॉरंटचे नाव 'सोलेअर' आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील ग्रँड हयात येथे आहे. रेस्टॉरंटच्या लाँच सोहळ्या दरम्यान संजय दत्त बायकोसोबत स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाला. संजय दत्तच्या नवीन कोऱ्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट पदार्थ खायला मिळणार आहेत.
'बागी 4' चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. 'बागी 4' 5 सप्टेंबरला रिलीज झाला. चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ पाहायला मिळत आहे. 'बागी 4'मध्ये ॲक्शन आणि रोमान्सचा धमाका आहे. 'बागी 4'ने थिएटरमध्ये चांगली कमाई केली. 'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे. टायगर श्रॉफ, सोनम बाजवा, संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच संजय दत्त रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.