Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : Wildcard एन्ट्री घेतलेला संग्राम अवघ्या २ आठवड्यातच घराबाहेर, पण कारण काय? बाहेर येताच केली भावुक पोस्ट

Sangram Chougule Eliminated : वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले अवघ्या २ आठवड्यात घराबाहेर पडला आहे. त्याच्या घराबाहेर जाण्याचे कारण आणि एलिमिनेशन नंतरची पहिली पोस्ट वाचा.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) चा गेम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. प्रत्येकजण आपला खेळ दाखवत आहेत. या आठवड्यात वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले अवघ्या 14 दिवसात घराबाहेर गेला आहे. दोन आठवड्यापूर्वी संग्रामची घरात एन्ट्री झाली होती.

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्याला मध्येच खेळ सोडावा लागला आहे. त्या घरातील कोणतेही काम करता येत नव्हते. तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. तसेच तो घरात राहीला असता तरी, कोणत्याही टास्कमध्ये भाग घेऊ शकला नसता.

या आठवड्यात भाऊचा धक्का पाहायला न मिळता 'महाराष्ट्राचा धक्का' पार पडत आहे. घरात पत्रकार परिषद आयोजित केली गेली. यात पत्रकारांनी भन्नाट प्रश्न विचारून स्पर्धकांना बोलते केले. या भागांचे सूत्रसंचालन महाराष्ट्राला हसवणाऱ्या डॉ. निलेश साबळे यांनी केलं. पत्रकार परिषदेनंतर संग्रामला (Sangram Chougule) कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आले.

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेल्या संग्राम चौगुले बाहेर आल्यावर पहिली सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात संग्रामने लिहिलं की, "गंभीर दुखापतीमुळे मला बिग बॉस घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद! पुन्हा आपली भेट लवकर होईल. तुमच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी लवकर बरा होईन. " असे म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'बिग बॉस' डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तो घरातील आपली नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडतो. अनेक सदस्य त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करतात. मात्र सध्या अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. या आठवड्यात संग्राम बाहेर गेल्यामुळे आज कोणाचा प्रवास संपणार किंवा सर्व सेफ होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT