Sangharsh Yodha Movie In Mohan Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'मध्ये अभिनेते मोहन जोशी दिसणार महत्वाच्या भूमिकेत; First Look Out

Mohan Joshi New Film: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Sangharsh Yodha Movie In Mohan Joshi

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनप्रवास (Biopic) लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून प्रदर्शनसाठी तयार झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. सध्या टीझरनंतर मालिकेमध्ये कोणकोणते स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, याची माहिती समोर येत आहे. चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. (Marathi Film)

मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतंच मोहन जोशी यांचा चित्रपटातला पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांना त्यांच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या अभिनयाने त्यांना वेगळीच प्रसिद्धी दिली आहे. (Manoj Jarange Patil)

'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Actors)

अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या अभिनयाने त्यांना वेगळीच प्रसिद्धी दिली आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, पुष्पक विमान, गुंडा सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे.(Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

नंदूरबारच्या कलेक्टरचा नवा पायंडा,खेड्यातल्या अंगणवाडी कलेक्टरची मुलं

नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT