Sanchita Ugale Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanchita Ugale Death: आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्री संचिता उगले प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

Sanchita Ugale Death: टीव्ही अभिनेत्री संचिता उगले आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमासह तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Shruti Vilas Kadam

Sanchita Ugale Death: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी मुंबईतील नालासोपारा येथे राहत्या घरी आत्महत्या केली. अवघ्या 22 वर्षांच्या वयात तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात राहणाऱ्या संचिता उगलेने आपल्या घरातील बेडरूममध्ये साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित पवार यांनी सांगितले की, संचिता गेल्या तीन वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. कामाच्या वाढत्या ताणामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर उपचारही सुरू होते आणि ती मानसोपचारतज्ज्ञांच्या संपर्कात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या दिवशी सायंकाळी साधारण सहा वाजता संचिता यांच्या आई-वडिलांनी बाजारात जाण्यासाठी घर सोडले. त्यावेळी तिची धाकटी बहीण अंजली तिच्यासोबत होती. साडेसहा वाजेपर्यंत दोघी एकत्र होत्या. त्यानंतर अंजली डान्स क्लाससाठी गेली आणि साडेसहा ते सात या वेळेत संचिता आपल्या बेडरूममध्ये एकटीच होती. याच काळात तिने टोकाचे पाऊल उचलले आणि साडीचा वापर करत पंख्याला लटकून गळफास घेतला. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान पोलिसांना संचिता आणि तिच्या मानसोपचारतज्ज्ञांमधील काही संभाषणांची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये तिने गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले होते. काही गोष्टी आठवत नसल्याची तक्रारही तिने डॉक्टरांकडे केली होती. याशिवाय कामाशी संबंधित अनेक अडचणींचाही ती सामना करत असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संचिता उगलेच्या आई-वडिलांसह तिच्या मावशीची चौकशी केली आहे. तसेच काही जवळच्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांची चौकशी केली जाणार असून त्यांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, संचिता उगलेच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेमुळे तिचे चाहते आणि सहकारी कलाकार अजूनही धक्क्यात असून, पोलिस तपासातून आणखी कोणती माहिती समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tree Fall Crisis: मुंबईत ४ दिवसांत ७०० झाडे कोसळली, ३ जणांचा मृत्यू

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर डलनेस आलाय? मग घरी तयार करा हा टोनर, मिळेल नॅचरल ग्लो

School Closed: पालघरमधील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी; पावसाचा अलर्ट

केडीएमसीतील शिंदेसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी, नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर्सना मारहाण

रानात मिळणारी टाकळ्याची भाजी पावसाळ्यात आवर्जून खा, चवीसाठी आणि आरोग्यासाठीही एकदम भारी

SCROLL FOR NEXT