Sanam Teri Kasam Re-Release Collection instagram
मनोरंजन बातम्या

Sanam Teri Kasam Re-Release Collection: बॉक्स ऑफिसवर प्रेमाची जादू; 'सनम तेरी कसम'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, कलेक्शनचा आकडा किती?

Sanam Teri Kasam Box Office Collection : एक अनोखी लव्ह स्टोरी असलेला 'सनम तेरी कसम' चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने कितीचा गल्ला जमावला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. सध्या सर्वत्र प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. ही प्रेमाची क्रेझ सध्या बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य करणारा 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) चित्रपट रि-रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने रि-रिलीजमध्ये बंपर कमाई केली आहे.

'सनम तेरी कसम' हा रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अबिनेत्री मावरा होकेन आहेत. 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 5 फेब्रुवारी 2016 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेड लावले. हा चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. ही हृदयस्पर्शी कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

'सनम तेरी कसम' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सनम तेरी कसम' हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'सनम तेरी कसम' चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दिसऱ्या दिवशी चित्रपटाने 5 कोटींचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सनम तेरी कसम' चित्रपटाने 3 दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने आतापर्यंत जवळपास एकूण 14.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'सनम तेरी कसम' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याने जवळपास 8-9 कोटींचे कलेक्शन केले होते. मात्र आता पुन्हा रिलीज झाल्यावर चित्रपटाने तीन दिवसात प्रेक्षकांच्या मनावर जादू केली असून 9 कोटींवर कमाई केली आहे. तसेच 7 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या 'लवयापा' चित्रपटाला ही कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. या चित्रपटाने जवळपास 5 कोटी कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT